शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शिस्तीअभावी रस्ते बनताहेत ‘मौत का कुँआ

By admin | Updated: April 19, 2017 04:30 IST

बेदरकार वाहनचालक... बेशिस्त पादचारी... आणि गाफिल प्रशासकीय व्यवस्था या तिघांच्या एकत्रित प्रयत्नानेच रस्ते वाहतूक कमालीची धोकादायक ठरत आहे

पुणे : बेदरकार वाहनचालक... बेशिस्त पादचारी... आणि गाफिल प्रशासकीय व्यवस्था या तिघांच्या एकत्रित प्रयत्नानेच रस्ते वाहतूक कमालीची धोकादायक ठरत आहे. वाहन कोठूनही, कशाही पद्धतीने दामटणे, रस्ता दुभाजकदेखील पादचाऱ्यांचे हक्काचे ठिकाण असल्यासारखे वागण्याचे प्रकार दिसून येत आहे. दुसरीकडे सुरळीत वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांसाठी पूरक वातावरण निर्माण करण्यात महानगरपालिकेलादेखील यश आलेले नाही. त्यामुळे रस्ते वाहतूक म्हणजे साहसवादच ठरत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून दिसून आले. माणूस आणि वाहनांना पदपथ आणि रस्त्यांवरून सुरळीत जाता येईल, असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आहे, तर रस्त्यांचा वापर वाहनांसाठी आणि पदपथांचा आणि झेब्रा क्रॉसिंगचा वापर पादचाऱ्यांनी केला पाहिजे. मात्र, या तिनही पातळीवरील जबाबदार व्यक्ती आणि नागरिक आपापली जबाबदारी पार पाडताना दिसत नाहीत. प्रत्येक जण आपल्या जबाबदारीच्या उलटच वागत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बहुतांश पुणेकर दररोज अपघातांची अधिकाधिक शक्यताच निर्माण करताना दिसत आहे. परिणामी याला अपघात म्हणायचे की जीवघेण्या साहसवादामुळे ओढवलेले संकट असा सवाल उपस्थित होत आहे. एका बेदरकार मोटारचालक महिलेच्या धडकेने माय-लेकींना आपला जीव गमवावा लागला. तसेच आणखी तीन जण गंभीर जखमी आहेत. त्याच बाणेर रस्त्यासह शहरातील वाहतुकीच्या रस्त्यांची लोकमतने मंगळवारी पाहणी केली. बाणेर रस्त्यावर झालेल्या अपघाताच्या कोणत्याच खुणा अपघातस्थळी नव्हत्या. उलट काही बेशिस्त पादचारी आणि वाहनचालकही तेथे आढळून आले. एक दुचाकीचालक बेफिकीरपणे रस्ता दुभाजकावरून गाडी पलीकडील रस्त्यावर दामटत होता. पादचारीदेखील दुभाजकाचा वापर रस्ता ओलांडण्यासाठी करीत होते. शहरात दुभाजक अर्धा फूट उंचीचे असो की, अडीच ते तीन फुटांचे असो पादचाऱ्यांना त्याचा काही फरक पडत नाही. घराचा उंबरठा ओलांडल्यासारखा ते रस्ता दुभाजक ओलांडतात. जीवघेण्या पद्धतीने दुभाजकावर उडी मारून रस्ता पार करणारे साहसवादीदेखील काही कमी नाही. (प्रतिनिधी)१पदपथांची अवस्था बाणेर, सातारा रस्ता, शिवाजी रस्ता या परिसरात फारशी चांगली नाही. अनेक ठिकाणी पदपथांवर वाहने, विविध प्रकारच्या विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पदपथ नावालाच दिसून येत आहे. संचेती रुग्णालयाशेजारील पुलावरून जाताना जेमतेम अडीच फूट असलेला पदपथ पुढे दीड फुटांपर्यंत निमूळता होतो. २विरुद्ध दिशेला तर तेदेखील नसल्याने वाहनांबरोबरच पादचाऱ्यांचा प्रवाहदेखील बरोबरीनेच जात असल्याचे चित्र होते. सातारा रस्त्यावर सिटी प्राईड सिनेमागृहासमोरील पदपथावर तर चारचाकी गाड्याच उभ्या केल्याचे दिसून आले. वाहनचालक, पादचारी, वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासन अशी चांगलीच भट्टी जमून आल्याने शहरातील वाहतूक दिवसेंदिवस भयंकर होत आहे. सिग्नल तोडणे सामान्य बाबबहुतांश वाहनचालक वाहतुकीच्या सर्व नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसतात. झेब्रा क्रॉसिंग न पाळणे ही तर अगदीच किरकोळ गोष्ट आहे. बीआरटीचा रस्ता अनेक जण स्वत:साठीचा हा खास मार्गच असल्याचे समजतात. सिग्नलचा लाल-केशरी-पादचारी दिवा पाळणे हे खरे तर सांगण्याची गोष्ट नाही. मात्र, कोणत्याही सिग्नलला थांबले तरी किती वाहनचालक सिग्नल पाळतात हे वाहने मोजूनदेखील समजते. त्यामुळे शहरात आता सिग्नल तोडणे ही सामान्य बाब असल्याचे मानावयास हरकत नसल्याचे चित्र आहे. पुणे विद्यापीठ परिसर असो की सातारा रस्ता सर्वच ठिकाणी सिग्नल तोडण्याचे प्रमाण बरेच असल्याचे दिसून आले.पादचारी आणि डोंबाऱ्याचा खेळ शहरात अगडी अर्धा फूट उंचीचे आणि दोन-अडीच फूट रुंदीचे सिमेंट काँक्रिटचे ठोकळे रस्तादुभाजक म्हणून वापरण्यात आले आहेत. काही ठिकाणी लोखंडी रेलिंगपासून ते अडीच ते तीन फूट उंचीचे सिमेंट काँक्रिटचे मोठे ब्लॉक दुभाजक म्हणून वापरण्यात आले आहेत. अधिक उंचीच्या दुभाजकाचे आव्हान आपले अनेक पादचारी राजा सहजच पेलत आहेत. रेलिंग करा की काँक्रिटचे ठोकळे आम्ही उड्या मारून जाणार असे चित्र बाणेर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्ता आणि सातारा रस्त्यावरदेखील दिसून आले. बाणेर रस्त्यावर तर सुमारे अडीच तीन फूट उंचीच्या काँक्रिट दुभाजकावर पुन्हा रेलिंग लावल्याचेदेखील काही ठिकाणी दिसून आले. त्यामुळे डोंबारी खेळ दाखविणाऱ्या या पादचाऱ्यांसाठी बहुधा प्रशासनाला पाच ते सहा फुटांची भिंतच बांधावी लागणार काय? असा प्रश्न उपस्थित होतो. सातारा रस्त्यावरील स्वामी विवेकानंद पुतळ््याअलीकडील सिग्नलवर दोघा पादचाऱ्यांनी उडी मारूनच दोन-अडीच फुटांचा दुभाजक ओलांडला. या गडबडीत एक जरी पादचारी रस्त्यावर पडला असता तर मागून येणाऱ्या पीएमपी बसखाली गेला असता. संचेती रुग्णालयासमोरील पुलावरून जाणे म्हणजे कसरत करण्याचा प्रकारच आहे. एका ठिकाणी जेमतेम अडीच फूट रुंदीचा भाग पादचारी मार्ग म्हणून वापरण्यात येतो. पुढे हा भाग पुलाच्या कठड्याशी समांतर होतो. खालून रेल्वेलाईन गेलेली आहे. त्याच्याविरुद्ध बाजूला तर तीदेखील सोय नाही. त्यामुळे पादचारी व विशेषत: पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी रस्त्यावरूनच कसरत करीत चालताना दिसून आले.