शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

कोकणातले रस्ते दुरुस्त होणार?

By admin | Updated: August 7, 2014 02:01 IST

महामार्गावरिल सर्व खड्डे पुढील 2 ते 3 दिवसात भरू, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिक:यांना दिल्या.

मुंबई : आगामी गणोशोत्सवासाठी कोकणात जाणा:या विविध वाहनांची होणारी गर्दी विचारात घेता मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी या महामार्गावरील सर्व खड्डे 2क् ऑगस्ट पयर्ंत भरून हा महामार्ग सुस्थितीत करावा, अन्यथा राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे 21 ऑगस्टपासून या महामार्गावरिल सर्व खड्डे पुढील 2 ते 3 दिवसात भरू, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिक:यांना दिल्या. 
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 17 वरील खड्डे भरणो, रूंदीकरण, चौपदरीकरण या अनुषंगाने गणोशोत्सवात कोकणात जाणा:या वाहनांना त्रस होऊ नये म्हणून तातडीने उपाययोजना करण्यासाठी आज छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस उद्योगमंत्री नारायण राणो, तसेच कोकणातील आमदार श्रीमती मिनाक्षी पाटील, सुर्यकांत दळवी, विजय गिरकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य व्यवस्थापक एन.के. जैन, राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बां) श्यामलकुमार मुखर्जी, सचिव (रस्ते) व्ही.आर.नाईक, रायगड, र}ागिरी व सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी, वाहतुक पोलीस विभागाचे अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम, वन, परिवहन व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महाड-नातूनगर-विन्हेरे हा रस्ता कशेडी घाटास पयार्यी असून तो सुस्थितीत ठेवावा, अशी सूचना करून भुजबळ यावेळी म्हणाले की रायगड, र}ागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतुक पोलीस व संबंधीत अधिका:यांनी समन्वयाने गणोशोत्सवात या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, यासाठी काम करावे.  (विशेष प्रतिनिधी)
 
च्नारायण राणो म्हणाले की, मुंबई-गोवा महामागार्चा 
विकास आणि चौपदरीकरण 
हे सार्वजनिक हिताचे काम असल्याने या कामाच्या आड येणा:या तक्रारींचे व अडचणींचे जिल्हाधिक:यांनी प्राधान्याने निवारण करावे.
 
च्बैठकीत संबंधीत अधिका:यांनी 475 कि.मी लांबीच्या व सहा भागात विभागलेल्या मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 
17 वरील दुरूस्ती आणि चौपदरीकरणाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. 
 
च्मुंबईत दीड हजारांहून अधिक खड्डे हे पेव्हरब्लॉकमुळे पडले आहेत़ त्यामुळे गणरायाचे आगमन व विसजर्न जिकिरीचे ठरणार असल्याचे सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांनी पालिकेच्या आज निदर्शनास आणल़े मात्र, 25 ऑगस्टपूर्वी सर्व खड्डे बुजवण्यात येतील, असे दरवर्षीचे आश्वासन चिकटवून प्रशासनाने सुटका करून घेतली़
च्गणोशोत्सवाच्या तयारीसाठी महापौर सुनील प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात आज विशेष बैठक पार पडली़ यात पोलीस, बृहन्मुंबई सार्वजनिक गणोशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी, महापालिका व अन्य प्राधिकरणांचे अधिकारी उपस्थित होत़े या वेळी समन्वय समितीने खड्डय़ांची यादीच देऊन प्रशासनाची बोलती बंद केली़ या यादीनुसार गणरायाचे आगमन व विसजर्नाचे 8क् मार्ग खड्डय़ांत आहेत़ 
 
च्मात्र, पेव्हरब्लॉक टाकलेले रस्ते सार्वजनिक मंडळांच्या डोकेदुखीचे कारण ठरले आहेत़ पेव्हरब्लॉक उखडल्यामुळे रस्ते असमतोल झाल्याचे समन्वय समितीने महापौरांच्या निदर्शनास आणल़े गणरायाचे आगमन 29 ऑगस्ट रोजी होत आह़े तत्पूर्वी 25 ऑगस्टर्पयत सर्व खड्डे बुजवण्यात येतील, अशी हमी अतिरिक्त आयुक्त एस़व्ही़आऱ श्रीनिवास यांनी या वेळी दिली़ 
 
अतिक्रमणो ताबडतोब काढा
आंबेत-मंडणगड हा समांतर रस्ताही सुस्थितीत ठेवावा. दक्षिण भारतातून येणारी वाहतूक कोल्हापूरमार्गे वळवावी. तसेच, अवजड 
वाहनांना रात्री 8 ते सकाळी 8 या कालावधीत या महामार्गावर वाहतूक करण्यास बंदी घालावी. अशी वाहने बंदीच्या काळात उभी करता यावीत, म्हणून योग्य ठिकाणी मैदाने अथवा वाहने उभी करण्यासाठी जागा निश्चित करावी. वाहनांना सर्वाधिक अडथळा वडखळ नाका परिसरात होत असल्याने वाहतुकीला अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणो ताबडतोब काढून टाकण्याच्या सूचनाही भुजबळांनी संबंधित अधिका:यांना दिल्या.
 
नवीन मंडळांना परवानगी
मुंबईत गतवर्षी 11 हजार 527 सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांची नोंद झाली होती़ मात्र, उद्यान, मैदानांमध्ये मंडळांना मंडप उभारण्यास गेल्या वर्षी मनाई करण्यात आली होती़ यंदा नवीन मंडळांकडे जागा, धर्मादाय संस्थेची परवानगी असल्यास मंडप लावण्यास अनुमती मिळणार आह़े
मुंबईतील खड्डय़ांची नोंद (6 ऑगस्ट)
एकूण खड्डे   5352
नियोजन   4879
बुजवण्याचे काम सुरू   4512
बुजवले   395क्
 
ऐन गणोशोत्सव काळात एसटीची सेवा कोलमडणार?
मुंबई : करारातील उर्वरित 5क् टक्के रकमेचे त्वरित वाटप करा, अवैध खासगी प्रवासी वाहतूक बंद करा, शासनाने महामंडळास देय असलेली 1,364 कोटी रक्कम रोख स्वरूपात द्या, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी मान्यताप्राप्त असलेल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून गेले काही दिवस सातत्याने आंदोलन केले जात आहे. मात्र, आता हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय कामगार संघटनेने घेतला असून ऐन गणोशोत्सवात आंदोलन करून एसटी सेवेचा बो:या वाजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
   याची रंगीत तालीम म्हणून 12 ऑगस्ट रोजी रजा आंदोलन करून मुंबईतील आझाद मैदानात धरणो आंदोलन केले जाणार आहे. मंगळवारीही विविध मागण्यांसाठी राज्यपातळीवर आगारांत आंदोलन करण्यात आले. बुधवारी संघटनेकडून परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण, परिवहन सचिव शैलेशकुमार शर्मा यांच्यासह एसटी अधिका:यांची भेट घेतली आणि मागण्यांचे निवेदन सादर केले. मात्र, या वेळी फक्त आश्वासनांवरच बोळवण करण्यात आल्यामुळे कामगार संघटनेने आंदोलनाची धार तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी कामगार संघटनेकडून प्रत्येक वर्षी गर्दीच्या हंगामातच आंदोलन केल्याची परंपरा आहे. मागील दोन वर्षातही ऐन गणोशोत्सवाच्या तोंडावर आंदोलनाचा इशारा देत एसटी प्रशासनाला आणि प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न कामगार संघटनेकडून करण्यात आला होता. आता या वेळीही ऐन गणोशोत्सवाच्या तोंडावर कामगार संघटनेने रजा आंदोलनाचा निर्णय घेत त्याप्रमाणो तयारी सुरू केली आहे. प्रथम याची रंगीत तालीम म्हणून 12 ऑगस्ट रोजी आझाद मैदानात धरणो आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात राज्यातील अनेक कर्मचारी, कामगारवर्ग सामील होणार आहे. आपल्या विभागात रजेचा अर्ज देऊनच कर्मचारी आणि कामगार सामील होणार असल्याचे सांगण्यात येते. हे आंदोलन झाल्यानंतरच ऑगस्ट महिनाअखेरीस गणोशोत्सव येत असून त्या वेळी पुन्हा एकदा रजा आंदोलन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)