वाशिम : वाहनधारकाला वाहन्न चालवित असताना मागाहून येणार्या वाहनांची स्थिती आणि अंदाज कळावा, याकरीता दुचाकी, चारचाकी व इतर मोठया वाहनांदेखिल साईड ग्लास बसविलेले असता. मात्र, आपल्या वाहनाची शोभा जाईल म्हणून अनेक वाहन चालक आपल्या वाहनांना साईड ग्लास लावित नसल्याची बाब 'लोकमत'तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. मोटार वाहन कायदयानुसार पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिकवर चालणार्या कुठल्याही दुचाकी अथवा चारचाकी वाहनाच्या दोन्ही बाजुला, चालकाला मागाहून येणारे वाहन दिसेल, अशा ठिकाणी दोन्ही बाजुने साईड मिरर लावणे अनिवार्य आहे. मात्र फॅशन करण्याच्या नादात तरूण- तरूणीच नव्हे तर जेष्ठांनादेशिल या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. यामध्ये सर्वाधिक उल्लंघन करणारे मात्र कॉलेज युवक युवतींचाच समावेश आहे. केवळ आवडत नाही म्हाून अनकांकरवी साईड मिरर काढून ठेवले जातात. एखादी दुर्घटना घडल्यास त्यांचे गंभीर परिणाम रस्त्याने जाणार्या इतर नागरिकांनादेखिल भोगावे लागू शकतात. त्यामुळे वैयकितक निर्णय घेताना त्याचे परिणाम सार्वजनिक तर उरणार नाही ना याची जाणीव प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. अलीकडच्या काळात शहरातीलरस्त्यांवर घडणार्या दुर्घटनांचे प्रमाण लक्षात घेवून ह्यलोकमतह्ण ने शहरातील अनेक दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना याबाबत काही प्रश्न विचारलेत. नागरिकांच्या आणि वाहतूक पोलीसांच्या नजरेतून अंत्यत क्षुल्ल्क असलेल्या या बाबीचा उहापोह केल्यानंतर काही निष्कर्ष समोर आलेत. अनेक दुचाकी व चारचाकी वाहनधारक फॅशन म्हणून वाहनांना साईड मिरर लावण्याचे टाळतात. तर काही जण याबाबत कारवाई होवू शकते यापासूनच अनभिज्ञ आढळून आलेत. तसेच काही बहाद्दर वाहनधारकांनी तर साईड मिररची आवश्यकताच काय असा प्रतिप्रश्न सुध्दा केला. काहींनी मात्र साईड ग्लास अंत्यत आवश्यक असल्याचे प्रामाणिकपणे सांगितले. अनेकदा लहान सहान अपघातामुळे तुटफूट झाल्याने साईड मिरर तुटल्यास परवडणारे नसल्याने परत लावण्यासचे टाळले जाते. भरीसभर एका बाजुच्या साईउ मिरर तुटल्यास दुसर्या बाजुचा देखिल काढून टाकला जातो. अनेकदा गर्दीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांचे साईड मिरर चोरीला देखिल जातात असे प्रकार शहरात वाढले आहेत. अनेक तरूण-तरूणींकडून केवळ चेहरा न्याहाळण्यासाठीच यांचा वापर केला जातो. नियमांच्या विरोधात जाणार्या या सर्व बाबींकडे वाहतूक पोलीसांकडून दुर्लक्ष केल्या जाते. यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. असा पुसटसा विचारही त्यांच्या मनात येत नाही.
वाहनचालकांना साईड मिररची ‘अँलर्जी’!
By admin | Updated: July 26, 2014 22:23 IST