मुंबई : मुंबई महानगर पालिकेतील रस्ते घोटाळा प्रकरणात पालिकेच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलिसांनी रेलकॉन आर.के.मधानी, आर.के.मधानी, रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड, महावीर रोड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, जे.कुमार के. आर. कन्स्ट्रक्शन आणि आरपीएसकेआर कन्स्ट्रक्शन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अतिरिक्त आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी खड्डेमुक्त मुंबईसाठी साडेसात हजार कोटी रुपयांचा रस्त्यांचा मास्टर प्लॅन तयार केला होता. मात्र या कामामध्ये अनियमितता आढळून येताच पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी तो रद्द करत या कामाच्या चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते.
रस्ते घोटाळाप्रकरणी अखेर गुन्हा दाखल
By admin | Updated: April 28, 2016 04:53 IST