शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
13
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
14
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
15
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
16
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

जिल्ह्यातील नदी,नाले भरले

By admin | Updated: September 7, 2014 00:29 IST

लोहा/किनवट/माहूर/बिलोली/ हिमायतनगर : माहूर, किनवट आणि किनवट तालुक्यात पावसाची रिपरिप सुरु आहे.

लोहा/किनवट/माहूर/बिलोली/ हिमायतनगर : माहूर, किनवट आणि किनवट तालुक्यात पावसाची रिपरिप सुरु आहे. किनवट तालुक्यात १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ५४ मि. मी. पावसाची नोंद झाली तर पावसामुळे श्रीक्षेत्र माहुरातील कार्यालयांना गळती लागली तर जुन्या लोह्यातून वाहणाऱ्या नदीला पूर आल्याने लोह्यातील आंबेडकरनगरात पाणी शिरले.किनवट: पावसामुळे काहीअंशी पिकांना जीवदान मिळणार असले तरी पडणाऱ्या भविष्यातील टंचाई उद्भवू नये म्हणून मदत होणार आहे़ पावसामुळे बळीराजा सुखावला आहे़ पाऊस जरी बरसत असला तरी पिकांची आणेवारी मात्र घटणारच असल्याने शासनाने तालुक्यातील ४८ हजार शेतकऱ्यांना सरसकट मदत करून धीर देण्याची मागणी आहे़ शुक्रवारपर्यंत जेमतेम जलसाठा असलेल्या काही प्रकल्पात पाणीसाठा वाढला तर सिरपूर व मांडवी हे दोन प्रकल्प ओव्हरफूल होण्याच्या मार्गावर आहेत़ तालुक्यात आतापर्यंत ४३४ मि़ मी़ इतका पाऊस पडला.पैनगंगा नदीसह सर्वच नाल्यात पाणीश्रीक्षेत्र माहूर: श्रीक्षेत्र माहूर शहरासह तालुकाभरात समाधानकारक पाऊस सुरू असल्याने पैनगंगा नदीसह सर्वच नाल्यात पाणी वाहू लागले़शहरात ३१ आॅगस्ट रोजी ३० मि़ मी़ पाऊस झाला़ तर आजपर्यंत शहरासह तालुक्यातील वानोळा, वाईबाजार, सिंदखेड, माहूर या सर्कलमध्ये एकूण ४५९़१२ मि़ मी़ पाऊस झाल्याने तालुक्यातील ३४ हजार ४०० हेक्टर पेरणीलायक शेती क्षेत्रापैकी एकूण ३३ हजार ६०० हेक्टर ९६ टक्के शेतीक्षेत्रात झालेली पेरणी समाधानकारकरित्या उगवली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी व्ही़ आऱ चन्ना यांनी दिली़शहरातील नगरपंचायत, पोलिस ठाणे, सा़बां़विभाग कार्यालयासह विश्रामगृह निवासस्थाने ग्रामीण रुग्णालय तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, कर्मचारी निवासस्थाने, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, वनपरिक्षेत्र कार्यालय, निवासस्थाने, तहसील कार्यालयासह याच प्रशासकीय इमारतीत असलेले पंचायत समिती कार्यालय, दुय्यम निबंधक, भूमीअभिलेख, उपकोषागार कार्यालया यासह मराविम, बीएसएनएल, कृउबास, आश्रमशाळासह सर्वच शासकीय कार्यालये रिमझिम तथा मुरवणी पाणी पडत असल्याने गळत असून अनेक जुनाट कार्यालये व निवासस्थाने धोकादायक स्थितीत आहेत़माहूरच्या पोलिस ठाण्याची इमारत व निवासस्थाने सन १९५८ साली बांधलेली असून पोलिस ठाण्याच्या आवारात ३६ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी १६ निवासस्थाने बांधलेली असून या सर्व निवासस्थानाच्या छत व भिंतीतून पाणी पडत असल्याने छताला पॉलिथीन बांधून पोलिसांना दिवस-रात्र जागून काढावे लागत आहे.बिलोलीत सतत दोन दिवस पाऊसबिलोली : मागच्या दोन दिवसांत ५० मि़ मी़ पाऊस झाला़ नाले, तलाव आदीमध्ये थोड्याफार प्रमाणात पाणी दिसून येत आहे़ लातूर, बीड जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्याने सीमावर्ती मांजरा नदीत पाणी वाहतांना दिसत आहे़ तालुक्यातील कुंडलवाडी, सगरोळी, लोहगाव, आदमपूर, रामतीर्थ सर्कलमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला़हिमायतनगर: रिमझिम पाऊसहिमायतनगर : तालुक्यात पोळा सणापासून रिमझिम पावसाच्या सरी पडल्याने पिकापुरता पाऊस झाला़ परंतु ३०, ३१ आॅगस्ट व १ सप्टेंबर या तीन दिवसात थोडा-थोडा खंड देवून पाऊस चालू असून नदी, नाले पहिल्यांदाच वाहिले़ जमिनीत भरपूर ओलावा झाला असून शेतकरी आनंदीत आहेत़गेल्या दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही़ ग्रामीण भागात व गल्लीत चिखल झाला़ शेतातील वखर, फवारणी, खत टाकणे, निंदणे आदी कामे बंद आहेत़ शेतात जनावरांना अजून बऱ्यापैकी चारा झाला नाही़ अनेक शेतकऱ्यांनी औत मोडले़ दुभती जनावरेही कमी झाली़ यांत्रिक शेती शेतकरी करीत आहेत़ नागरणे, फणने, पेरणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने करीत आहेत़ (वार्ताहर)मानार प्रकल्पात पाणीसाठा वाढलाबारूळ : येथील मानार जलाशय हे कंधार, नायगाव, बिलोली, मुखेडसह परिसरातील तालुक्याची कामधेनू असून दोन ते तीन दिवासांच्या मुसळधार पावसाने प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली़ प्रकल्पात २० टक्के पाणीसाठा झाला़ बारूळ मानार प्रकल्पात २६ आॅगस्टपर्यंत १६ टक्के साठा होता़ पण पोळा झाल्यानंतर पावसाचा जोर वाढून येत्या २४ तासात ५४ मि़मी़ पाऊस पडल्याने प्रकल्पात वाढ झाली असून सध्या प्रकल्पात ३२९़७ पाणीपातळी असून प्रकल्पात सध्या २० टक्के साठा आहे़ या प्रकल्पामुळे २२ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आहे. शेतकऱ्याजवळील कडबा चारा संपल्याने शेतकरी चिंतेत होता़ काही शेतकऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून २ हजार टन प्रमाणे किंवा १२०० सरीप्रमाणे ऊस आणून आपल्या पशूला चारा म्हणून टाकत होते़ मत्स्य व्यवसाय करणारे भोई समाज स्थलांतर करीत होते़ पावसामुळे काही दिवसापुरता का असेना चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे़ भोई समाजाला प्रकल्प भरेल का अशी आशा वाटत आहे़