मुंबई: उद्योगधंद्यामुळे नद्या प्रदूषित होऊ नये, त्यांना संरक्षण मिळावे, म्हणून राज्य सरकारने २००० मध्ये धोरण आखले. मात्र हे धोरण राज्य सरकारने अचानकपणे रद्द करून कोणतेही पर्यायी धोरण न आखल्याने उच्च न्यायालयाने आधीचे धोरण रद्द का केले? अशी विचारणा करत २९ जानेवारी रोजी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांना याबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. उद्योगांपासून नद्यांचा बचाव व्हावा व त्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी राज्य सरकारने २००० मध्ये नदी संरक्षण आणि संवर्धन धोरण आखलेले धोरण राज्य सरकारने २०१४ मध्ये रद्द केले. याविरुद्ध विश्वंभर चौधरी यांनी जनहित याचिका दाखल केली. (प्रतिनिधी)
‘नदी संरक्षण व संवर्धन धोरण का गुंडाळले?’
By admin | Updated: January 28, 2016 01:25 IST