शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Emotional Video: ...अन् विलासरावांच्या 'स्पर्शा'ने रितेश गहिवरला, बाप-लेकाची हळवी गळाभेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 11:42 IST

प्रसन्न, दिलखुलास, अजातशत्रू व्यक्तिमत्व आणि चतुर, सर्वसमावेशक अन् बेधडक नेतृत्व ही विलासरावांची ओळख.

ठळक मुद्देप्रसन्न, दिलखुलास, अजातशत्रू व्यक्तिमत्व आणि चतुर, सर्वसमावेशक अन् बेधडक नेतृत्व ही विलासरावांची ओळख. आजच्या राजकीय परिस्थितीत विलासराव हवे होते, असं म्हणणारेही खूप जण आहेत. विलासरावांच्या 'व्हर्च्युअल स्पर्शा'नं रितेशलाही गहिवरून आल्याचं व्हिडीओत दिसतं. 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज 75 वी जयंती. प्रसन्न, दिलखुलास, अजातशत्रू व्यक्तिमत्व आणि चतुर, सर्वसमावेशक अन् बेधडक नेतृत्व ही विलासरावांची ओळख. त्यांच्या अनेक आठवणी त्यांच्या समर्थकांच्या, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात आजही कायम आहेत. आजच्या राजकीय परिस्थितीत विलासराव हवे होते, असं म्हणणारेही खूप जण आहेत. 

विलासराव देशमुख यांच्या जयंतीदिनी काँग्रेस कार्यकर्ते सोशल मीडियावरून त्यांना अभिवादन करत आहेत. देशमुख परिवाराने दिवंगत विलासराव देशमुख यांच्या असंख्य आठवणी जपून ठेवल्या आहेत. मांजरा कारखान्यावर भव्य स्मृतिस्थळ उभारले आहे. दरवर्षी या दिवशी त्यांच्या समाधीस्थळावर जयंती साजरी केली जाते. यावर्षी लॉकडाऊनमुळे ते शक्य नाही. देशमुख कुटुंबीयांनी घरच्या घरीच विलासरावांच्या स्मृतींना वंदन केलं. विलासरावांचा सुपुत्र अभिनेता रितेश देशमुखनं एका हृदयस्पर्शी व्हिडीओतून चाहत्यांना आपल्या वडिलांची भेट घडवली आहे.  विलासरावांच्या 'व्हर्च्युअल स्पर्शा'नं रितेशलाही गहिवरून आल्याचं व्हिडीओत दिसतं. 

विलासरावांचं जॅकेट न्याहाळत असताना त्यातून त्यांचा हात बाहेर येतो आणि रितेशच्या डोक्यावरून मायेनं फिरतो, त्याची पाठ थोपटतो, असा एक क्रिएटिव्ह व्हिडीओ रितेशनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. बाप-लेकाची ही गळाभेट पाहताना मन आणि डोळे भरून येतात. या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. विलासराव आणि रितेशचं नातं किती घट्ट होतं, हे त्यातून स्पष्टपणे जाणवतं. याआधीही वडिलांच्या आठवणीनं  रितेश खूपदा हळवा झाला आहे.

टॅग्स :Ritesh Deshmukhरितेश देशमुख