शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

मुंबईवरचा धोका टळला; ओखी चक्रीवादळ गुजरातकडे सरकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 19:44 IST

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले ओखी चक्रीवादळ ताशी २१ किलोमीटर या वेगाने गुजरातकडे सरकले असतानाच; चक्रीवादळाचा विपरित परिणाम म्हणून मंगळवारी दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या पावसामुळे मुंबईचा वेग संथ झाला होता.

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले ओखी चक्रीवादळ ताशी 21 किलोमीटर या वेगाने गुजरातकडे सरकल्यामुळे मुंबईवरचा धोका टळला आहे. चक्रीवादळाचा विपरित परिणामामुळे मंगळवारी दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरांत पडलेल्या पावसामुळे मुंबईचा वेग संथ झाला होता. चक्रीवादळासह पावसामुळे मंगळवारी मुंबईतल्या शाळा बंद ठेवण्यात आल्या असतानाच उर्वरित दैनंदिन व्यवहारही धीम्या गतीने सुरू होते. मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूकही काही अंशी धीम्या गतीने सुरू असतानाच मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकलही स्लो ट्रॅकवर आली होती.ओखी चक्रीवादळाचा मुंबईला प्रत्यक्ष फटका बसला नसला तरी हवामान खात्याने दिलेल्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सर्वच आपत्कालीन यंत्रणा सतर्क असल्याने पाऊस वगळता सुदैवाने मुंबईकरांना वादळाला सामोरे जावे लागले नाही. दरम्यान, समुद्रात मुंबईपासून दोनशे किलोमीटर अंतरावर घोंगावत असलेले ओखी चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेन सरकले आहे.केरळ आणि तामिळनाडूचे अतोनात नुकसान करणारे ओखी चक्रीवादळ वा-याच्या वेगाने गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातकडे सरकत होते. वादळ जसजसे वेगाने पुढे सरकत होते; तसतसे वा-याचा वेगही काही अंशी कमी होत होता. गोवा आणि महाराष्ट्राच्या किना-यापर्यंत येईस्तोवर वादळाचा वेग ताशी एकवीस किलोमीटर एवढा झाला होता. चक्रीवादळाचा विपरित परिणाम म्हणून राज्यासह मुंबईत पाऊस पडेल, अशी शक्यताही भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली होती. त्यानुसार, सोमवारी दिवसभर मुंबईतले वातावरण ढगाळ राहिले. आणि सायंकाळी सहानंतर सुरु झालेल्या पावसाने आपला मारा मंगळवारी दिवसभर कायम ठेवला.सोमवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत फोर्ट, नरिमन पॉइंटपासून दहिसर आणि मुलुंडपर्यंतच्या परिसराला अक्षरश: गारद केले. विशेषत: मंगळवारी सकाळीच पावसाने जोर धरला. दुपारचे काही क्षण वगळता तीननंतर पावसाने पुन्हा आपला वेग पकडला. मुळात भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी सतर्कता बाळगल्याचे चित्र होते. मंगळवारी सकाळी निर्माण झालेले वातावरण पाहूनच अनेकांनी घराबाहेरचा रस्ता धरण्याचे काही प्रमाणात टाळल्याचे चित्र होते. सकाळाच्या पावसाचा वेग किंचितसा कमी झाल्यानंतर मात्र मुंबईकरांची पाऊले कार्यालयांकडे वळल्याची चित्र होते.दरम्यानच्या काळात मुंबईच्या रस्त्यांवर पाऊसाचा धिंगाणा सुरुच होता. पावसाचा वेग आणि मारा कमी असल्याने कोठेही पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत. विशेष म्हणजे पावसाचा मारा सुरु असतानादेखील जंक्शन स्पॉट वगळता वाहतूक कोंडीच्या फारशा तक्रारी प्राप्त झाल्या नसल्याचे चित्र होते..........................................पावसाचा इशारा कायमवल्साड, सुरत, नवसारी, भरुच, दंग, तापी, अमरेली, गिर-सोमनाथ, भावनगर, दिव, दमण, दादरा-नगर हवेली या परिसरात बुधवारी पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किना-यावर बुधवारी ताशी ७० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. ठिकठिकाणी पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील वातावरण बुधवारी ढगाळ राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे..........................................खवळलेला समुद्रसोमवारी सायंकाळपासून खवळलेल्या समुद्राचे तांडव मंगळवारी दिवसभर कायम होते. मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटीसह वर्सोवा चौपाटीवर उसळलेल्या समुद्रांच्या लाटांनी मुंबईकरांना धडकी भरली होती. प्रत्यक्षात मात्र मुंबईपासून अवघ्या दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या ओखी वादळाने दक्षिण गुजरातकडे आगेकुच केल्याने मुंबईकरांच्या जीवात जीव आल्याचे चित्र होते..........................................अनुयायांना फटकामहापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर देशासह राज्यातून दाखल झालेल्या लाखो अनुयायांना ओखी वादळामुळे पडलेल्या पावसाचा फटका बसला. पावसामुळे शिवाजी पार्क मैदानात चिखल झाल्याने अनुयायांना लगतच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. दरम्यान, हवामान खात्याने जर पावसाचा इशारा दिला होता तर महापालिकेने अगोदरच अनुयायांची पर्यायी व्यवस्था का केली नाही? असा सवालही आता उपस्थित झाला आहे..........................................तैनात है हम्म...राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तीन तुकड्यांना मुंबईत तैनात करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्याही सतर्क होत्या. जवाहरलाल पोर्ट ट्रस्ट आणि बॉम्बे पोर्ट ट्रस्टही सतर्क होते..........................................परतलेल्या बोटीजिल्हा समुद्रात गेलेल्या बोटींची संख्या परतलेल्या बोटी बेपत्ता बोटीमुंबई ९४३ ९४३ ०रायगड २५१ २५० १पालघर ६९४ ६९४ ०ठाणे ६९० ६९० ०रत्नागिरी २८ २८ ०एकूण २६०६ २६०५ १.........................................देवगड बंदर, सिंधुदुर्ग - ६३ बोटी - ८०९ मच्छिमाररत्नागिरी जिल्हयातील वेगवेगळ्या बंदरावर ७९ बोटी आणि १ हजार ४७६ मच्छिमारांनी आश्रय घेतला आहे.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळMumbaiमुंबई