शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उगवत्या खेळाडूचा डेंग्यूने घेतला बळी

By admin | Updated: August 1, 2014 11:28 IST

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांत विशेष ठसा उमटवण्याची धमक असणारी अॅथलेटिक्स खेळातील प्रतिभावान खेळाडू अश्विनी बोलकरच्या रूपाने एक प्रतिभावान खेळाडू औरंगाबादने बुधवारी रात्री ११ वाजता गमावला.

आंतरविद्यापीठीय खेळाडू अश्विनी बोलकरचे दुर्दैवी निधनऔरंगाबाद : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांत विशेष ठसा उमटवण्याची धमक असणारी अॅथलेटिक्स खेळातील प्रतिभावान खेळाडू अश्विनी बोलकरच्या रूपाने एक प्रतिभावान खेळाडू औरंगाबादने बुधवारी रात्री ११ वाजता गमावला. या उगवत्या खेळाडूचे डेंग्यूच्या आजारामुळे दुर्दैवी निधन झाले.विवेकानंद महाविद्यालयात बी. एस्सी.च्या तिसर्‍या वर्षात शिकत असणार्‍या अश्विनी बोलकर हिच्यावर आज सकाळी ११ वाजता एन-११ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.१५ जुलै रोजी १९ वर्षे पूर्ण झालेल्या अश्विनीत जिद्द, मेहनत आणि साहस या गुणांचा मिलाफ होता. अॅथलेटिक्स आणि जम्परोपमध्ये स्थानिक असो की राज्यस्तरीय स्पर्धा, तिने तब्बल ४0 पदकांची लयलूट केली होती आणि जवळपास २00 प्रमाणपत्रे तिला खेळातील कौशल्यामुळे मिळाली होती.अश्विनीला बालपणापासूनच खेळाची आवड निर्माण झाली. त्यामुळे बळीराम पाटील प्रशालेत असताना ती प्रारंभापासूनच खो-खो, लंगडी अशा स्पर्धांत उत्साहाने सहभागी व्हायची आणि नंतर ती अॅथलेटिक्स खेळाकडे वळली. बळीराम पाटील प्रशालेत तर तिला भारताची प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषाचीच पदवी दिली होती. शाळेत असताना ती प्रथम ३ कि. मी. धावण्याच्या शर्यतीत सहभागी व्हायची आणि त्यानंतर तिचा प्रगतीचा ग्राफ कायम उंचावतच राहिला. विद्यापीठातर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत तर ती मराठवाड्यातील २00 मीटर धावण्यात नेहमीच नंबर वन असायची. मोठमोठ्या खेळाडूला लाजवेल असे जबरदस्त रनिंग टेक्निक असणार्‍या अश्विनीने २0१३ मध्ये बंगलोर येथे कल्याणी ऑल इंडिया आंतरविद्यापीठ स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारण्याची किमया साधली होती. अशी कामगिरी करणारी अश्विनी ही मराठवाड्यातील एकमेव खेळाडू. त्याचप्रमाणे तीन वेळेस तिने आंतरजिल्हा राष्ट्रीय स्पर्धेतही सहभाग नोंदवला होता.२00८ ते २0१४ या कालावधीत तिने अहमदनगर, पुणे, जळगाव, सोलापूर, अंधेरी, परभणी, नाशिक आदी ठिकाणी अॅथलेटिक्स आणि जम्परोप स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवताना पदकांची लूट केली. अॅथलेटिक्समधील १00 आणि २00 मीटर धावण्यात तिचे विशेष कौशल्य होते.