शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

विठूनामाच्या गजरात रिंगण

By admin | Updated: July 23, 2015 01:12 IST

दाटून आलेले ढग, मधेच कडकडीत ऊन, टिपेला पोहोचलेला टाळ-मृदंगाचा गजर, तुतारीची ललकारी... विठुनामाचा अखंड सुरू असलेला जयघोष

शहाजी फुरडे-पाटील / राजीव लोहोकरे , अकलूजउंच पताका झळकती, टाळ-मृदंग वाजती, पे्रमे आनंदे नाचती, भद्र जाती विठ्ठलाचे,आले हरीचे विनट, वीर विठ्ठलाचे सुभट, भेणे झाले दिकवट, पळती थाट दोषांचे.दाटून आलेले ढग, मधेच कडकडीत ऊन, टिपेला पोहोचलेला टाळ-मृदंगाचा गजर, तुतारीची ललकारी... विठुनामाचा अखंड सुरू असलेला जयघोष व ज्ञानबा-तुकाराम अशा नामस्मरणाच्या भक्तीपूर्ण वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले रिंगण अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयात उत्साही व भक्तीपूर्ण वातावरणात झाले़ लाखो भक्तांनी हा नयनरम्य सोहळा पाहिला.पुणे जिल्ह्यातील मुक्काम संपवून पालखी सोहळा बुधवारी सकाळी अकलूजमध्ये दाखल झाला़ अकलूजकरांचे स्वागत स्वीकारून एकामागून एक दिंड्या माने विद्यालयाच्या प्रांगणात येत होत्या़ सुरुवातीला पताकाधारी, त्यानंतर कलश व तुळशी घेतलेल्या महिला, वीणेकरी, टाळकरी, पखवाजवादक यांनी एक फेरी मारल्यानंतर पालखी सोहळ्याचे सर्व मानकरी, देहू संस्थानचे विश्वस्त यांनीदेखील धावत एक फेरी मारली़ अश्वाने पाच फेऱ्या पूर्ण केल्यानंतर त्याच्या टापाखालची माती आपल्या कपाळी लावून भाविकांनी आपल्याला तुकोबा भेटल्याची धन्यता मानली़ हरीच्या खेळाला आला रंगबाळासाहेब बोचरे , सदाशिवनगर नाचत जावू त्याच्या गावा रेखेळिया सुख देईल विसावाझाकोळलेल्या नभाखाली, टाळ-मृदंगाचा गजर आणि माऊली माऊलीच्या गजरात आसमंत दणाणले असताना दोन अश्वांनी मारलेल्या वेगवान फेऱ्यांनी अवघ्या वैष्णवजनांचे डोळे तृप्त झाले. गुरुवारी खुडूसला रिंगण करून पालखी वेळापूर येथे जाणार आहे.आषाढी वारीसाठी ऊन-वाऱ्याची तमा न बाळगता वाटचाल करणाऱ्या वैष्णवांना कधी पंढरपुरला पोहोचेन आणि विठूरायाला भेटेन, असे झाले आहे. त्या ओढीने निघालेल्या वैष्णवांना बुधवारी सदाशिवनगरच्या मैदानावर खेळाचा मनमुराद आनंद लुटता आला.कानात वारे शिरल्यासारखे धावणाऱ्या माऊलींच्या अश्वामागे स्वाराचा अश्व धावत होता. हा पाठशिवणीचा खेळ चालू असताना दोन फेऱ्या कधी पूर्ण झाल्या हे कळल ेसुद्धा नाही.