शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

विरोधी पक्षांनी नवी उभारी घेण्याची हीच योग्य वेळ!

By admin | Updated: May 21, 2017 00:48 IST

नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली निवडणूक जिंकल्यापासून विरोधी पक्षांची चिंता प्रचंड वाढलेली आहे. सर्वच पक्ष सैरभर झाले आहेत. काँग्रेसचा बुरूज ढासळलेला आहे.

नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली निवडणूक जिंकल्यापासून विरोधी पक्षांची चिंता प्रचंड वाढलेली आहे. सर्वच पक्ष सैरभर झाले आहेत. काँग्रेसचा बुरूज ढासळलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या पक्षांचीही वाताहत सुरू आहे. जोपर्यंत काँग्रेस स्वत: पुनर्भरारी घेत नाही, तोपर्यंत इतर पक्षांंमध्ये आलेली मरगळ हटणार नाही आणि देशात राजकीय पटलावर मोदींसमोर नवे आव्हानही उभे राहणार नाही. असे आव्हान निर्माण करण्यासाठी सर्वच पक्षांनी एका दमाने उभारी घेण्याची गरज आहे, असा सूचक इशारा माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत दिला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र यावेत, अशी तुमची इच्छा आहे का?खरे आहे, आम्हाला एकत्र यावेच लागणार आहे. त्याशिवाय पर्यायच नाही, पण एकत्र येऊ म्हणून एकच होऊ असे नाही. यापूर्वीही आम्ही एकत्र निवडणूक लढविल्या आहेत. सरकारमध्येही एकत्र होतो. आता पुढील आव्हान पेलण्यासाठी एकमूठ करावी लागेल. या दोन पक्षांनाच नव्हे, तर इतर पक्षांनीही एकजुटीने काम करावे लागेल, तरच भविष्यात बदल घडू शकेल.तुम्ही अनेक वर्ष सत्तेत होता़ यशस्वीरीत्या मंत्रिपदही सांभाळले आहे आणि राष्ट्रीय राजकारणातही तुमचा दबदबा आहे. त्यामुळे सध्याच्या एकूणच राजकीय परिस्थितीकडे तुम्ही कसे बघता? विरोधात असलेले सर्वच पक्ष सध्या काय करत आहेत?खरं सांगायचे, तर सर्वच विरोधी पक्ष सध्या गप्प बसून आहेत. जी काही विरोधी पक्षांसाठीची जागा असते, तीच मुळात कमकुवत झालेली आहे. विरोधी पक्षांचा काँग्रेसरूपी जो बुरूज होता, तोच खचला आहे, दुबळा झाला आहे़ त्यामुळे काँग्रेसवर अवलंबून असलेले इतर पक्षही सैरभैर झाले आहेत. देशभरात ज्या काही आमच्या समविचारी पक्षांच्या जागा होत्या, त्या जागाही भाजपा अक्षरश: गिळंकृत करत आहे. या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल, तर सर्वच पक्षांनी मोठी उभारी घेण्याची गरज आहे. मुळात सर्वांत प्रथम काँग्रेसचे पुनरुज्जीवन झाले पाहिजे. काँग्रेसने स्वत:च स्वत:ला ‘रिइन्व्हेंट’ करायला हवे, तरच इतर पक्षांतही जान येईल, अन्यथा सध्या भाजपाला रान मोकळे मिळालेले आहे. विरोधी पक्षांत ताकदच नसल्याने भाजपाला संधी मिळाली आहे, शिवाय त्यांची ताकदही वाढते आहे. वेगवेगळ्या राज्यांत आपली शक्ती निर्माण करण्यासाठी भाजपा काम करतेय़ आम्ही मात्र, अजूनही फारशा कामाला लागलेलो नाही़ म्हणून यातून उभे राहायचे असेल, तर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी मिळून एकत्र विचारमंथन करावे लागेल. वरिष्ठ पातळीवरील सगळ्याच नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे लागेल. एक सक्षम पर्याय उभा करावा लागेल.

केवळ काँग्रेसने हे करून चालेल का? राष्ट्रवादी काँग्रेसचे काय? राष्ट्रवादी हे आव्हान कसे पेलत आहे?राष्ट्रवादी काँग्रेससमोरही हेच आव्हान आहे. आमच्या परीने आम्हीही काम करत आहोत़ जनतेत जात आहोत, पक्षात विविध विषयांवर बैठकाही घेत आहोत.राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार. त्यांच्याच कुटुंबातल्यांना मोठे स्थान आहे, असाही आरोप होताना दिसतो़ ही घराणेशाही नाही का?प्रफुल्ल पटेल : शरद पवार हे राष्ट्रवादीचे आधारस्तंभ आहेत. आम्हाला ते मान्यच आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार. कारण त्यांच्या तोडीचे काम आज पक्षात कोणीच करत नाही. ते इथून पुढेही खूप वर्षे काम करणार आहेत. आमच्या पक्षात अनेक नेत्यांमध्ये नेतृत्व क्षमता आहे, जे राज्याला-देशाला पुढे नेऊ शकतात. पक्षात कोणत्याही प्रकारची घराणेशाही नाही. अजित पवार, सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांचा नातू या साऱ्यांनाच त्यांच्या योग्यतेचे स्थान आहे. आमचा पक्ष लोकशाही पद्धतीने चालतो. त्यामुळेच इतर नेत्यांनाही मोठ्या स्थानी मान मिळतो.

राष्ट्रवादीचेही अस्तित्व फारसे दिसत नाही. नेते विखुरलेले वाटतात. त्याबद्दल काय सांगाल?आमच्याही लक्षात ही गोष्ट आली आहे. आमच्या परीने आम्ही राज्यभरात काम करत आहोत. आम्ही दौरे करतो, बैठका घेतो. नेत्यांना भेटतो आणि कार्यकर्त्यांशीही चर्चा करतो. तुमच्यापर्यंत हे सगळेच येते असे नाही.सुप्रिया सुळे संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत. आपली एक वेगळी छाप निर्माण करत आहेत. सुप्रिया सुळे यांनी लोकसभा आणि राज्यसभाही गाजवली आहे. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे. त्या तरुण आहेत. दिल्लीतही चांगले स्थान आहे. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाला आम्ही सर्व जण आकार देत आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तुमची चांगली मैत्री आहे़ त्यामुळे तुम्हाला निवडणुकीतही त्यांची मदत झाली असा आरोप होतो़ ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरले, पण तुमच्या भंडारामध्ये आले नाहीत़ याचा अर्थ काय समजायचा?मी केंद्रात मंत्री होतो, तेव्हापासून आम्ही एकमेकांना चांगले ओळखतो़ त्यांचा विकासावर अधिक भर असतो आणि त्यात ते कधीच अडसर आणत नाहीत़ मंत्री असताना मी जेव्हा-जेव्हा गुजरातमध्ये गेलो, तेव्हा-तेव्हा मोदींना कार्यक्रमांना आमंत्रित करायचो़ विकासकामात राजकारण येता कामा नये, असा आमचा होरा होता़ आता केंद्रात ते सत्तेत आहेत आणि विकासकामात ते राजकीय अभिनिवेश करत नाहीत़ कारण त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे़ त्यामुळे ही मैत्री केवळ राजकीय पातळीवरील नाही, तर विकासातून पुढे आलेली आहे़ मोदी यांची काम करण्याची वेगळी पद्धती आहे़, पण असे असले, तरी निवडणुकीच्या राजकारणात मैत्री बघितली जात नाही़ आपल्या पक्षाचा विजय हेच ध्येय नजरेसमोर असते. प्रत्येकाला आपले उमेदवार निवडून आणायचे असतात़ त्यामुळे अशा आरोपांत तथ्य नाही.

तुम्ही स्वत: विदर्भाचे आहात, तेथील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत़ विदर्भ-मराठवाडा अजूनही मागास राहिल्याची टीका केली जाते़ ती तुमच्यावरही होत असते़ त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?विदर्भाचा विकास व्हायलाच हवा़ नागपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असावे, अशी माझी महत्त्वाकांक्षा होती़ दिल्ली, मुंबई आणि हैदराबादच्या धर्तीवर नागपूरचे विमानतळ तयार करायचे होते़ मात्र, काही स्थानिक नेत्यांनी त्याला विरोध केला़ हे विमानतळ केंद्राने बांधायला त्यांचा विरोध होता़ त्यामुळे त्या वेळी ते काम राज्य सरकारकडे द्यावे लागले़ तेव्हाच जर ते पूर्ण झाले असते, तर आता नागपूरहूनही आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी विमान उपलब्ध असते़ मिहानसारखा प्रकल्प नागपुरात आणला़ बोइंग कार्पोरेशनसारखी कंपनी आणली़ त्यामुळे रोजगार वाढला़ मी मंत्री असताना, नागरी हवाई प्रवासासाठी अनेक सोईसुविधा उपलब्ध झाल्या़ माझ्या काळात ४०० नवीन विमाने भारतात आली़ त्यामुळे कनेक्टिव्हिटीही वाढली आहे़ प्रवाशांची सोय झाली़, पण विदर्भातून साथ मिळाली असती, तर आणखी विकास करू शकलो असतो़ तो करू शकलो नाही, याची खंत आहे. आता विदर्भात अनेक नेते महत्त्वाच्या पदावर आहेत़ केंद्रात मोठ्या स्थानी असलेले स्वत: नितीन गडकरी आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारही विदर्भाचेच आहेत़ मी आहेच. माजी खासदार विजय दर्डा हेसुद्धा आहेत. त्यामुळे विदर्भाच्या विकासात आता कुठेही अडथळा येता कामा नये़ केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपाचे सरकार आहे आणि दोन्ही ठिकाणी संख्याबळही अधिक आहे़ त्यामुळे विकासाचा मार्ग आता मोकळा होणार आहे. या विकासाला आमचाही पाठिंबा असेलच़ नुसते रडत बसून किंवा टीका करून हा प्रश्न सुटणारा नाही.

भारतात फूटबॉलचा फिवर आता कुठे वाढू लागला आहे आणि भारताचा फूटबॉल संघही क्रमवारीत थोडा पुढे सरकला आहे़ ही सकारात्मक कामगिरी दिसत असतानाच, भारतात १७ वर्षांखालील फूटबॉलपटूंचा फिफा विश्वचषक होऊ घातला आहे़ तुम्ही भारतीय अखिल भारतीय फूटबॉल फेडरेशनचे अध्यक्षही आहात़ फिफाच्या वित्तीय समितीवरही आहात. आंतरराष्ट्रीय पातळीवरील ही स्पर्धा आपल्या देशात भरवण्याचे नियोजन करणे कसे शक्य झाले?स्पर्धेच्या आयोजनात तसा आपला फारसा सहभाग नसला, तरी स्वागत समिती आपल्या देशाची असते़ बाकी सर्व आयोजन फेडरेशन इंटरनॅशनल दी फूटबॉल असोसिएशन अर्थात, ‘फिफा’ ही आंतरराष्ट्रीय फूटबॉल संघटनाच करत असते़ खर्चही फिफा करते़ आपल्याकडेही आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आहेत़ जेव्हा या स्पर्धेच्या आयोजनसाठी आपण आपली बाजू मांडली, त्या वेळी आपण निर्माण केलेल्या सुविधा त्यांच्यासमोर ठेवल्या़ त्यानंतर, फिफाची समिती आली. त्यांनीही सर्व स्टेडियम व सोयी बघितल्या़ त्यांना त्या आवडल्या. काही ठिकाणी त्यांनी सुधारणा सुचवल्या़ आपणही त्या मान्य केल्या़ नवी मुंबईतील डी़ वाय़ पाटील स्टेडियममध्ये सामने होणार आहेत़ तेथील खुर्च्यांबद्दल फिफा समितीने सूचना केल्या होत्या़ डी़ वाय़ पाटील स्टेडियमच्या प्रशासनाने त्या मान्य केल्या आहेत़ अशी स्पर्धा होणे ही देशासाठी भूषणावह बाब असते़ त्यातून अर्थव्यवस्थेलाही हातभार लागतो़ या स्पर्धेचे येत्या ५ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे़ हे सारे होत असले, तरी चांगल्या दर्जाच्या स्टेडियमची तशी आपल्या देशात आणि राज्यातही कमतरता आहेच़ खरे आहे़, पण परिस्थिती हळूहळू सुधारतेय़ नागपूरमध्ये फिफाचा सामना व्हावा, अशी माझी इच्छा होती़, पण तेथे आंतराराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम नाही़ तेथे ते व्हावे, अशी आमची इच्छा आहे़ एक मोठे स्टेडियम उभारण्यासाठी १५० कोटी रुपये खर्च येतो़ यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यायला हवा़ आम्हीही तशी मागणी करणार आहोत़ हे स्टेडियम पूर्ण झाले, तर नागपूरलाही आंतरराष्ट्रीय सामने होऊ शकतील.