शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत तिरंगा नेण्याचा मिळाला हक्क

By admin | Updated: February 21, 2016 03:34 IST

केंद्रीय विद्यापीठांमध्ये तिरंगा फडकावण्याचा निर्णय घेतल्याबद्दल लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांचे अभिनंदन केले.

विजय दर्डा : लोकप्रतिनिधींना मिळावा ध्वजारोहणाचा हक्क

पुणे : केंद्रीय विद्यापीठांमध्ये तिरंगा फडकावण्याचा निर्णय घेतल्याबद्दल लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांचे अभिनंदन केले.दर्डा म्हणाले, ‘‘ऐके काळी संसदेमध्ये तिरंग्याचा बॅच लावून जाणे गुन्हा होता. भैरोसिंह शेखावत त्या वेळी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती होते. मी संसदेत चर्चा घडवून आणली. ‘आमचा हा अधिकार आहे. तो आम्हाला मिळायला हवा,’ अशी मागणी मी संसदेत केली होती. त्यानंतर हा अधिकार आम्हाला मिळाला.’’ ते म्हणाले. ‘‘मुख्यमंत्री, राज्यपाल ध्वजारोहण करतात; पण स्थानिक स्तरावर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात खासदार, आमदार, सरपंच व इतर लोकप्रतिनिधी बसलेले असतात आणि तहसीलदार ध्वजारोहण करतात. हे चुकीचे आहे. ही कोणती लोकशाही? स्थानिक स्तरावरही ध्वजारोहणाचा अधिकार लोकप्रतिनिधींनाच मिळायला हवा. तिरंगा हा केवळ एक कपडा नाही. तिरंगा आपली ओळख आहे, ती आपली सभ्यता आहे. ’’ते म्हणाले, ‘‘शिक्षणाच्या माध्यमातून आपण युवकांमध्ये, समाजाला, शैक्षणिक, सांस्कृतिक, नैतिक, आर्थिक, धार्मिक, मानवीय मूल्यांची निर्मिती करतो. आज देशात युवकांची संख्या सर्वाधिक आहे. जर आपण जगात ज्ञानाच्या क्षेत्रात विश्वगुरूच्या रूपाने पुढे येण्यासाठी प्रयत्न करत असू, तर आपल्याला चांगल्या संसाधनांबरोबरच गुणवत्तेचीही निर्मिती करावी लागेल. स्मृती इराणी यांच्यासारख्या सशक्त, प्रज्ञावान मनुष्यबळ विकासमंत्री देशाला लाभलेल्या आहेत. देशात अनेक समस्या आहेत; पण त्यावर आपण शिक्षणाच्या माध्यमातून मात करू शकतो, असा विश्वास व्यक्त करून दर्डा म्हणाले, ‘‘लोकमत’ने आयोजित केलेल्या ‘शिक्षण संवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षणक्षेत्रातील अनेक प्रश्न पुढे आले आहेत. आपला देश खरंच कसले शिक्षण देतोय? युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यायोग्य शिक्षण त्यांना मिळतेय का? त्यांच्यात नैतिक मूल्ये रुजवतोय का? याचा विचार होण्याची गरज आहे.’’दर्डा म्हणाले, ‘‘शिक्षण हक्क कायद्यामुळे शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळाला आहे; पण आपण संस्कृती, सभ्यता आणि भाषा विसरत चाललो आहोत. माझी स्मृती इराणी व विनोद तावडे यांना विनंती आहे, की प्रत्येक विद्यार्थ्याला हिंदी, मातृभाषा आणि इंग्रजी या किमान ३ भाषा यायला हव्यात. त्या सर्व शाळांमध्ये बंधनकारक करायला हव्यात.’’