मुंब्रा : मुसळधार पावसामुळे मुंब्रा बायपासवर दरड कोसळली. यामुळे काही काळ वाहतूककोंडी झाली होती. मुंब्रा प्रभाग समितीचे अध्यक्ष अशरफ पठाण यांनी दरड हटवण्यासाठी पुढाकार घेतला तसेच शिवाजीनगर परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा लवकर व्हावा, यासाठी नाल्यात उतरून त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने नालेसफाई केली. सकाळी ९ ते १२ दरम्यान सुमारे तीन तास पडलेल्या पावसामुळे येथील शादीमहल रोड, चांदनगर आदी सखल भागांमधील रस्त्यावर पाणी साचले होते. रेल्वे स्थानकाजवळील प्रमुख बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले होते. कौसा भागातील मेहमुना अपार्टमेंट या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रस्त्यावर ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्याची पाहणी केली. (वार्ताहर)
मुंब्रा बायपासवर दरड कोसळली
By admin | Updated: August 1, 2016 03:27 IST