शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

खिल्ली

By admin | Updated: October 10, 2014 01:33 IST

कुठे मिळता आहेत आणि कोण देते आहे ? तुमच्याकडे त्यांचा कॉटॅक्ट नंबर आसेल तर मला द्या. सोसायटीच्या एकाच मजल्यावर आमचे चार फॅमिलिचे चार फ्लॅट आहेत

गीव्ह अस लक्ष्मी दर्शन आॅल्सो !पहिला : हाय गाय ! व्हेअर द विंड आॅफ इलेक्शन इज ब्लोर्इंग ? व्हॉट इच युवर अ‍ॅसेसमेंट ?दुसरा : लेट इट गोज इन टू द हेल . हू बॉदर्स अ‍ॅट लिस्ट आय एम नॉट.पहिला : आयला मी आयकला ते खरा आहे का रे?दुसरा : व्हॉट द हेल इज ईट ?पहिला : येका येका मताचे तीन-तीन हजार मिळताय म्हणे?तिसरा : कुठे मिळता आहेत आणि कोण देते आहे ? तुमच्याकडे त्यांचा कॉटॅक्ट नंबर आसेल तर मला द्या. सोसायटीच्या एकाच मजल्यावर आमचे चार फॅमिलिचे चार फ्लॅट आहेत. मोजून २२ मते आहेत. आयला ६६ हजार म्हणजे माझ्या tv prachar

ला कशाला विचारलं असत. या बातम्या साल्या ! उडत,उडत कळतात रे. आमच्या समोर झोपडपट्टी आहे. एका दिवसात प्रत्येक झोपडीवर डीटीएचच्या डीश लागल्या आहेत. तिथलीच बाई आमच्या घरी धुणभांडे करते. तिला बायकोने विचारल तर म्हणाली, कोणा कॅन्डीडेटनी सगळ््याचा खर्च केला. एकदम ६५० डीश आणि एक वर्षांचा री-चार्ज शिवाय एएमसी केले. म्हणजे घरटी साडेपाच हजार झालेत. शिवाय प्रत्येक माणसाला सफारीचा कपडा, आणि स्त्रीयांना सेमी पैठण्या. म्हणजे बघा राव १०-११ हजार तरी मिळाले असतील.दुसरा : व्हाय दिज रास्कल कॅन्डीडेट अ‍ॅण्ड देअर पार्टीज डिडंट केम टू अस? वुईकॅन आॅल्सो हेल्प देम इन द सेम मॅनर. इजंट इट?पहिला : माझ तेच म्हणण आहे. आयला मते विकण्याचा मक्ता काय फक्त झोपडपट्टीवाल्यांनी घेतला आहे काय ? वुईकॅन आॅल्सो सोल्ड अवर व्होट़तिसरा : आहो ताकाला जाऊन भांड लपवायचे दिवस गेले. माझ तर म्हणण आहे आता उमेदवारांचा दारो दार प्रचार सुरू होईल ना. तेव्हा आपणच त्यांना तसे सजेस्ट करूया.चौथा : व्हेरी नाईस स्ट्रॅटेजी. माझो तर अशी सजेशन आसय की सोसयटीच्या सगळ््या मेंबराक बोलवाचो अन् मताचा भाव मंजूर करून घ्याचो. अन् सगळ््या कॅन्डीडेटाक एसएमएस करून कळवून टाकाचो जाका गरज आसतंय तो येतय की. खरा की नाय ? काय भाव आसन त्याचा अमाऊंट बँकेच्या खात्यात भरून टाकाचो व्होटिंगच्या आदल्या दिवशी. अमाऊंट भरतलो की बँकेचो एसएमएस येतंय.पहिला : दॅटिज राईट़ आनी भाव फक्त मतांचा फिक्स कराचा. ज्याका जी पार्टी आवडतंय तिच्या कॅन्डीडेटाक त्याका त्या रेटनी करू देवूचो व्होटिंग . दिवाळीचो कपडोलक्तो नाय तर फटाक्याचो खर्चो आरामात निघून जातंय.तिसरा : आय हॅड डिफ्ररंट परर्स्पेशन. माझ काय म्हणण आहे ? आपण ना आपले व्होट विकण्यापेक्षा आॅक्शन करून आणि त्याची माहिती सगळ््या पक्षांच्या उमेदवारांना देऊ. त्याची बेस प्राईस घोषीत करू ज्याला जे-जे परवडेल तसा, तसा तो बोली लावेल, बोली वाढवेल. आपल्याला काय पाच वर्षातून दोनदाच चान्स आसतो. आपण तेव्हा नाही कमाई करणार तर केव्हा करणार? निवडून आले की, हे खा-खा खाणार सरकार अडचणीत सापडले की, स्वत:चे मत विकणार, मग आपल्याच बापानं काय घोडं मारलं आहे ? म्हणून व्हर्जीन व्होटर व्हायचं. सगळी दुनिया हात धुवून घेते आपण चार बोटे धुवून घेतली तर काय फरक पडतो? पहिला : आता बघा व्होटिंग जायचं म्हणजे वेळ द्या, स्वत:चे व्हेईकल वापरा, पेट्रोल, डिझेल खर्च करा. मतदानासाठी वेळ लागतो थोडा पण आख्खा दिवस बरबाद होतो. ना काही पिकनिक, ना काही मौजमजा. नुसता मेस.चौथा : माझो तो म्हन्नो आसा की, त्या इलेक्शन कमिशनाक टाळकोच न्हाय. ह्ये बॅनर लावतंय, अन् जाहिराती करतंय. समदा झूठ आसतंय अर येड्यांनो मत करणाऱ्याला हजार , पाचशे द्या बघा कसा टक्का वाढतोय मतदानाचा. त्या फ्लेक्स अन् बोर्डवाल्याच्या अन् जाहिरात कंपन्यांच्या मढ्यावर करोडो वतन्यापेक्षा या लोकशाहीच्या राजाला म्हणजे मतदाराक थोड थोडं भेटू द्या.पहिला : अ‍ॅबसोल्यूटली राईट . मी कालच वाचला पेपरमध्ये या निवडणुकीवर ५० हजार कोटी खर्च होणार. अन् त्यातला एक छदाम आम्हाला नाही.चौथा: मेल्यानू ! याकच म्हन्तय धन्याला धत्तूरा अन् नोकराक मलीदा.दुसरा : माका त वाटतंय या दुसरो इलेक्शन क्रांतीकराक एखादो दुसरो शेशन यावाक होवो. मेलो ! पाहिजे कित्याक ते कॅम्पेन अन् कार्यकर्त्याचो भुतावळ, ते टेम्पो इन ते लाउडस्पिकर, कशाक लागतंय ता मोठ्या -मोठ्या सबा अन त्या पदयात्रा. त्या रोड-शोचा बी काय काम नसा. त्या पेक्षा जो व्होटराक जास्त पैसा देईन त्याका व्होट़ असो नियमच करून टाकाचो. मताचो प्राईस ठरून टाकाचो. अन् त्याच्यावरती त्याचो लिलाव करूचो म्हन्जे इलेक्शन कमिशन देईन तो पैसा अन् कॅन्डीडेट देईन तो पैसा असो दुहेरी कमाई कलो तर माका गॅरंटी आसतंय जिवंतच काय मेलालासुद्धा व्होटिंगकराक स्वर्गातून खाली येतंय. आताचो व्होटिंग परसेंट किती ५० टक्के. या व्होटिंग रिफॉर्म केल्यावर दिडशे टक्यां म्होरं जात की नाय बगा ?पहिला : मंजूर याका आमचो सगळ््याचो अनुमोदन आसतंय. ठराव येक मताने मंजूर.- खिल्लारी