शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
3
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
4
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
5
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
6
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
7
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
8
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
9
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
10
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
12
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
13
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
14
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
15
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
16
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
18
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
19
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
20
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ लांबणीवरच

By admin | Updated: June 27, 2015 02:36 IST

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीला हायकोर्टाकडून नुकताच हिरवा कंदील दाखवण्यात आला. ही भाडेवाढ करण्यासाठी ४५ दिवसांत मीटरचे रिकॅलिब्रेशन करावे लागणार आहे

मुंबई : रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीला हायकोर्टाकडून नुकताच हिरवा कंदील दाखवण्यात आला. ही भाडेवाढ करण्यासाठी ४५ दिवसांत मीटरचे रिकॅलिब्रेशन करावे लागणार आहे. मात्र हे रिकॅलिब्रेशन करण्यास थोडा आणखी कालावधी लागणार आहे. त्यासाठी मीटरच्या सॉफ्टवेअरमधील बदलाला किमान सात दिवस लागणार असल्याचे वैधमापन शास्त्र विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ ही लांबणीवरच पडणार आहे.रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात एमएमआरटीएकडून (मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण) प्रत्येकी एक रुपया वाढ करण्यात आली. त्यामुळे रिक्षाचे भाडे १७ वरून १८ रुपये, तर टॅक्सीचे भाडे २१ रुपयावरून २२ रुपये होणार आहे. या भाडेवाढीला २४ जून रोजी मुंबई हायकोर्टानेही हिरवा कंदील दाखवला. मात्र मीटरचे रिकॅलिब्रेशन (मीटरमध्ये बदल) केल्याशिवाय चालक ही भाडेवाढ लागू करू शकत नाहीत. रिकॅलिब्रेशन करण्यासाठी किमान ४५ दिवसांची मुदत आरटीओकडून देण्यात आली आहे. याबाबत वैधमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक संजय पाण्डेय यांनी सांगितले की, मीटरमधील सॉफ्टवेअर बदलण्यासाठी किमान सात दिवस लागणार आहेत. हा बदल केल्यानंतरच मीटर रिकॅलिब्रेशनचे काम सुरू होईल. सध्या वैधमापन शास्त्र विभागाला नवीन भाड्याचे दरपत्रकच मिळाले आहे. त्यानुसार या विभागाकडून उत्पादकांना माहिती दिली जाईल आणि मगच सॉफ्टवेअरमध्ये बदल केला जाईल.