शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

रिक्षाचालकाकडून पुन्हा एसटीचालकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 03:08 IST

ठाण्यात घडलेली घटना ताजी असतानाच सोमवारी कल्याणमध्येही रिक्षा चालकाने एसटी चालकाला मारहाण केली.

कल्याण : रिक्षाचालकाच्या मारहाणीत एसटी चालकाचा मृत्यू झाल्याची भिवंडीतील घटना आणि त्यापाठोपाठ ठाण्यात घडलेली घटना ताजी असतानाच सोमवारी कल्याणमध्येही रिक्षा चालकाने एसटी चालकाला मारहाण केली. बस बळवण्याच्या जागी उभी केलेली रिक्षा पुढे घेण्याच्या वादातून हा प्रकार घडला. यामुळे कल्याण-डोंबिवलीत भररस्त्यात ठिकठिकाणी बेकायदा सुरू असलेल्या रिक्षातळांचा मुद्दा गंभीर बनला आहे. पालिकेचा ढिसाळपणा, पोलिसांचे दुर्लक्ष, आरटीओचा नसलेला बचक हे सारे मुद्दा यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आले आहेत. मारहाणीच्या घटनेचे वृत्त बस आगारात समजताच बसचालक-वाहकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान पोलिसांनी रिक्षाचालक सलीम अब्दुल पठाण (३०, रा. कल्याण) याला अटक केली आहे.अलिबागहून कल्याणला आलेली एसटी बस दुपारी साडेतीनच्या सुमारास कल्याण आगारात प्रवेश करत होती. तेव्हा बसचालक सुरेश भोसले (४३, रा. कोनगाव) यांनी पुढे उभी असलेली रिक्षा तिच्या चालकाला पुढे घेण्यास सांगितले. त्यावरून त्यांचा वाद झाला. त्यातून रिक्षा चालकाने बसचालक सुरेश भोसले यांना मारहाण केली. त्याने बोटाचा चावा घेतल्याचेही सुरूवातीला सांगितले जात होते. मात्र त्याला दुजोरा मिळू शकला नाही. भोसले यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एसटी स्थानक, केडीएमटी बसचे थांबे येथे दिवसभर रिक्षांची बेकायदा वर्दळ असते. रेल्वे स्टेशनसमोरील रस्त्याचा रिक्षाचालकांनी बेकायदा ताबा घेतला आहे. भररस्त्यात तीन-तीन रांगा करून प्रवासी भरले जातात. हे सर्व वाहतूक पोलिसांच्या डोळ््यादेखत सुरू असूनही ते कारवाई करत नसल्याचा प्रवाशांचा, वाहनचालकांचा आरोप आहे.एसटी चालकांप्रमाणेच अन्य वाहनचालकांनाही या रस्त्यावरून जाण्यास पुरेशी जागा नसते. त्याबाबत रिक्षाचालकांना काहीही सांगितले तरी ते हमरीतुमरीवर येतात. एकत्र येत शिवीगाळ-मारहाण करतात आणि पोलीस त्यात काहीही करत नाहीत, असा वाहनचालकांचाही आरोप आहे. (प्रतिनिधी) >पोलिसांकडून न्यायालयाचा अवमानमहाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे सचिव महादेव म्हस्के यांनी या मारहाणीच्या घटनेचा निषेध केला आहे. भिवंडीतील दुदैवी घटनेनंतर बस आगाराच्या प्रवेशद्वारावर जागा अडवून उभ्या असलेल्या रिक्षांचा मुद्दा पुढे आला. रिक्षांमुळे बस चालकांना व प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत पाठपुरावा केला गेला. त्यानंतरही परिस्थिती बदललेली नाही, हेच या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले, असे म्हस्के यांनी सांगितले. बस स्थानक परिसरापासून २०० मीटर अंतरावर कोणतेही खाजगी वाहन थांबवू नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत. पण त्याची अंमलबजावणी होत नाही, अशी खंत म्हस्के यांनी व्यक्त केली.