शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामातील भातपीक दुप्पट करणार

By admin | Updated: May 7, 2017 06:14 IST

कोकणातील ‘भात’ हे प्रमुख खरीप पीक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२पर्यंत दुप्पट करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने केलेल्या

विशेष प्रतिनिधी /लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : कोकणातील ‘भात’ हे प्रमुख खरीप पीक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२पर्यंत दुप्पट करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने केलेल्या विशेष नियोजनानुसार २०१७-१८ पासून ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ वैशिष्ट्यपूर्ण संपूर्ण मोहीम राज्यात हाती घेण्यात येत आहे. त्या अंतर्गत ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ मोहीम राज्यात रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर म्हणजेच, २५ मे रोजी शुभारंभ होऊन ८ जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे. कोकणातील पाऊस लवकर सुरू होत असल्याने ही मोहीम महाराष्ट्र दिन १ मे ते १५ मे यादरम्यान राबविण्यात येत आहे. कोकणातील प्रमुख खरीप पीक भात उत्पादन २०२२पर्यंत दुप्पट करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी पांडुरंग सिगेदार यांनी दिली. कृषी उत्पादन खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने व उत्पादन वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. बियाणे, रासायनिक खते व कीड नाशके या निविष्ठांवरील खर्च व पिकांच्या पूर्व मशागतीपासून काढणी व मळणीपर्यंत मजुरीवर होणारा खर्चही प्रामुख्याने शेती उत्पादन खर्च वाढण्याची कारणे असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर लहरी हवामानामुळे पाऊस कमी झाल्याने किंवा वेळेवर न पडल्याने निर्माण होणाऱ्या स्थितीचा पिकांवर विपरीत परिणाम होत असल्याने शेतीतील जोखीम वाढत आहे. त्यासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. भाताचे प्रमाणित बियाणे वापरल्यास शेतातील काही भाग पुढील हंगामासाठी स्वत:करिता बियाणे म्हणून वापरण्यासाठी राखून ठेवावा. मात्र, बियाण्यांसाठी राखून ठेवलेल्या क्षेत्रावरील पिकाची विशेष काळजी घ्यावी. एका हंगामात वापरलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून तयार झालेले बियाणे पुढील दोन हंगामापर्यंत वापरावे, अशी महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे. भात रोपवाटिकेत बियाणे पेरणीपूर्वी बियाण्यास ३ टक्के मिठाच्या पाण्याची, थायरम (३ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास) तद्नंतर पीएसबी जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. या पद्धतीने भात लागवडीसाठी एका ठिकाणी एकच रोपाला वाढवायचे असल्याने रोपवाटिकेत ५ किलो प्रतिहेक्टर या प्रमाणात बियाणे पेरावे. चारसूत्री पद्धतीने भात लागवडीसाठी रोपवाटिकेत वाणाच्या प्रकारानुसार २० ते ३० किलो प्रतिहेक्टरी या प्रमाणात बियाणे पेरावे. रोहू पद्धतीने बियाणे मोड आणून पेरल्यास बियाणाची उगवण चांगली होते. भात रोपवाटिकेत रोपांचे किडी-रोगांपासून संरक्षण केल्यास पुनर्लागवडीनंतरच्या पीक संरक्षणावरील खर्चात बचत होते. कोकणात भाताची पुनर्लागवड केली जाते. अशा ठिकाणी शेतकरी वा महिला गटांनी सामूहिक रोपवाटिका तयार कराव्यात. जेणे करून मजुरी व देखभाल खर्चामध्ये बचत होते. रोपांचे वय १२ ते १५ दिवसांचे असतानाच पुनर्लागवड पूर्ण करावी. अधिक वयाची रोपे लावल्यास रोपवाटिका व्यवस्थापनाचा खर्च वाढण्याबरोबरच फुटवे कमी आल्याने उत्पादनात घट होते. पूर्व मशागतीसाठी नांगरट व चिखलणीची कामेमिनी ट्रॅक्टर वा पॉवर टिलरद्वारे केल्यास मजुरी वाचते.भातशेती नफ्यासाठीविविध उपाययोजनाजमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीनुसार खतांचा वापर केल्यास उत्पादनवाढीबरोबरच रासायनिक खतांवरील खर्चात बचत, लावणी किंवा रोवणीनंतर चार चुडांच्या चौकोनात एक युरिया डीएपी ब्रिकेट खोचून नत्रखत कार्यक्षमरीत्या पिकास उपलब्ध करून देणे, तणांचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशकांचा योग्य वेळेस वापर, भातपिकातील तणांच्या बंदोबस्ताकरिता कोनोविंडरचा वापर, कीड-रोग सर्वेक्षणानुसार कीड व रोग नियंत्रण उपाय,कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळे, प्रकाश सापळे, पक्षीथांबे लावणे, जैविक कीडनाशकाचा वापर, पीक निसवताना व दाणे भरताना पुरेसे पाणी ठेवणे, भातपिकाच्या बांधावर तूर, भाजीपाला लागवड, भातकापणी यंत्राचा व भात मळणी यंत्राचा वापर, भातपिकानंतर उपलब्ध ओलाव्यावर हरभरा, वाल, चवळी या दुबार पिक लागवड, यांत्रिक सेवांचा वापर करावा, असा विश्वास कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केला. यांत्रिक पद्धतीने पुनर्लागवडीनेखर्च बचतभाताच्या शेतीभोवती गिरी पुष्पाची लागवड करून चिखलणीच्या वेळी हिरवळीचे खत म्हणून गिरीपुष्पाचा पाला चिखलात ४ टन एकरी गाडावा. भाताची पुनर्लागवड यांत्रिकी पद्धतीने केल्यास खर्चामध्ये २५ ते ४० टक्के बचत होते. गादी वाफ्यावर टोकन पद्धतीने भात लागवड तंत्राचा अवलंब करावा. एका हंगामात तयार केलेले गादी वाफे न मोडता, त्यावर पुढील पिकाची टोकन केल्याने खर्च वाचतो.