शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

‘पॉवर टेक्स इंडिया’ यंत्रमाग क्षेत्रात क्रांती

By admin | Updated: April 2, 2017 01:36 IST

यंत्रमागांना देण्यात येणाऱ्या सबसिडीत ३० टक्क्यांनी केलेली वाढ, कामगारांना विश्रांतीकरिता व निवासाकरिता व्यवस्था करण्याची केलेली तरतूद, ११ जणांनी एकत्र येऊन यार्न बँकेची स्थापना

भिवंडी : यंत्रमागांना देण्यात येणाऱ्या सबसिडीत ३० टक्क्यांनी केलेली वाढ, कामगारांना विश्रांतीकरिता व निवासाकरिता व्यवस्था करण्याची केलेली तरतूद, ११ जणांनी एकत्र येऊन यार्न बँकेची स्थापना करण्याची असलेली तरतूद आणि प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज देताना केवळ चार टक्के व्याजदराने परतफेड करण्याची सोय, यामुळे देशात यंत्रमाग क्रांती होईल, असा विश्वास केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी शनिवारी व्यक्त केला.यंत्रमाग उद्योगाकरिता आखलेल्या पॉवर टेक्स इंडिया या देशव्यापी योजनेचा शुभारंभ भिवंडीतून झाला. त्या वेळी स्मृती इराणी बोलत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या वेळी उपस्थित होते. पॉवर टेक्स इंडियामुळे देशातील यंत्रमागाला संजीवनी प्राप्त होऊन या उद्योगाला सोन्याचे दिवस येतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.इराणी म्हणाल्या की, विजेची कमतरता लक्षात घेता यंत्रमागधारकांनी सौरऊर्जेचा वापर केला तर भविष्यात भारत ऊर्जा क्षेत्रात संपन्न होईलच; पण यंत्रमागधारकांनाही लाभ होईल. देशातील ४५ टक्के कापड महाराष्ट्रात तयार होते. त्यापैकी जास्त उत्पादन भिवंडीत घेतले जाते. त्यामुळे योजनेचा प्रारंभ इथे करताना आनंद होत आहे.देशातील सुरत, बनारस, भागलपूर, बंगळुरू, वाराणसी, कोल्हापूर, बऱ्हाणपूर अशा ४३ यंत्रमाग शहरांतील मालक व कामगारांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी करून घेतले होते. इराणी व फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना योजनेची माहिती दिली. खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, वस्त्रोद्योग राज्यमंत्री सुभाष देशमुख, वस्त्रोद्योग आयुक्त कविता गुप्ता आदी या वेळी उपस्थित होते. इराणी म्हणाल्या की, यंत्रमाग उद्योगाला संजीवनी देण्याकरिता असलेल्या या योजनेत शासन एक लाख रुपयांचा मार्जीन मनी देईल. या सर्व योजना त्वरित व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वेबसाइटबरोबरच लवकर पॉवर टेक्सचे मोबाइल अ‍ॅप काढण्यात येईल. यंत्रमाग क्षेत्राला ऊर्जितावस्था देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वस्त्रोद्योग विभागाने तयार केलेली ही योजना देशात नवा इतिहास रचेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. याची सुरुवात भिवंडीसारख्या यंत्रमागाच्या राजधानीतून होते आहे, ही आमच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. यापूर्वी १००० कोटींची वीज सबसिडी दिली जात होती. ती आमच्या सरकारने अलीकडेच १५०० कोटी केली आहे. म्हणजे जवळजवळ ५० टक्के वाढ केली आहे. यासंदर्भात एका योजनेवर आम्ही काम करीत असून, लवकरच त्यातील निर्णय जाहीर करण्यात येतील, असेही फडणवीस म्हणाले. (प्रतिनिधी)