शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

‘सृष्टी गृहनिर्माणबाबत पुन्हा चौकशी’

By admin | Updated: August 3, 2016 05:40 IST

सृष्टी सहकारी गृहनिर्माण संस्थेत वाहन पार्किंगवरून झालेल्या वादाप्रकरणी पोलिसांमार्फत पुन्हा चौकशी करण्यात येईल

मुंबई : ठाण्यातील कोलबाड येथील सृष्टी सहकारी गृहनिर्माण संस्थेत वाहन पार्किंगवरून झालेल्या वादाप्रकरणी पोलिसांमार्फत पुन्हा चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. यासंदर्भातला प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य अमित साटम, संजय केळकर यांनी उपस्थित केला होता.या प्रकरणी पुन्हा सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच चुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत का, हेही तपासून पाहिले जाईल. चुकीचे गुन्हे दाखल झाले असतील, तर ते मागे घेण्यात येतील, असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. बनावट कागदपत्रेप्रकरणी विशेष पथकाकडून चौकशी - मुख्यमंत्रीनवी मुंबईत सिडकोच्या मालकीच्या भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करून इमारती उभारल्याबाबतच्या प्रकरणाची चौकशी सिडकोच्या विशेष पथकामार्फत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. आमदार संजय सावकारे आणि आमदार योगेश सागर यांनी यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला होता. नवी मुंबईतील कौपरखैरणे नोडमध्ये सेक्टर ९९ अस्तित्वात नाही. तथापि, कोपरखैरणे येथील सेक्टर ११ आणि ऐरोली सेक्टर ९ई येथील भूखंडाच्या वाटपाबाबत महामंडळाचे बनावट दस्तावेज तसेच त्रिपक्षीय करारनाम्याबाबतची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. सदर कागदपत्रांद्वारे नवी मुंबई महापालिकेकडून बांधकाम परवाना घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. याबाबत सर्व संबंधितांविरुद्ध नवी मुंबईच्या सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत; तसेच याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश २६ जुलै रोजी सिडको महामंडळाला देण्यात आले आहेत. (विशेष प्रतिनिधी)>एसआरए प्रकल्पासंदर्भात लवकरच बैठक - रवींद्र वायकरएसआरए प्रकल्पाच्या विकासकाने सभासदांची फसवणूक केल्याचे आरोप होत आहेत. याबाबत एसआरएचे संबंधित अधिकारी, विकासक यांच्यासमवेत आपण लवकरच बैठक घेऊ, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.अंधेरी येथील अमन, आकाश, आशियाना-ए आणि आशियाना-बी या एसआरए प्रकल्पांसंदर्भातला प्रश्न मंगळवारी हरीश पिंपळे, योगेश सागर, आशिष शेलार या सदस्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. या प्रश्नाबाबत सदस्यांनी सांगितलेली माहिती खरी मानून या प्रकल्पांची पूर्ण चौकशी करण्यात येईल तसेच याबाबत सविस्तर बैठकही लवकरच घेण्यात येईल, असे आश्वासन या वेळी वायकर यांनी दिले.‘ओमेगा कंपनीसंदर्भात चौकशी करू’परळ, शिवडी येथील ओमेगा इन्व्हेस्टमेंट कंपनीने अनधिकृतपणे इमारतीचे बांधकाम सुरू केल्यासंदर्भात पूर्ण चौकशी करण्यात येईल, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. डॉ. अनिल बोंडे, आशिष शेलार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते.>नदीपात्रात कचरा न टाकण्याचे तत्काळ आदेश देऊ - मुख्यमंत्रीरायगड जिल्ह्यातील रोहे तालुक्यातील कुंडलिका नदीपात्रात कचरा टाकला जाऊ नये, असे आदेश तत्काळ देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. कुंडलिका नदीत कचरा टाकून पात्र बुजविण्यात येत असल्याबाबतचा प्रश्न विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात भरतशेठ गोगावले यांनी उपस्थित केला होता.सदस्यांनी विधानसभेत दिलेली माहिती खरी मानून याबाबत तत्काळ सूचना देण्यात येतील. याशिवाय आता राज्य शासनामार्फत डम्पिंग ग्राउंडसाठी जागा देण्यात येत नसून कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणाऱ्या नगरपालिकांच्या प्रकल्पांना अनुदान देण्यात येत आहे. नदीसंवर्धन योजना ही केंद्र आणि राज्य शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत राबविण्यात येते. तथापि, रोहा नगर परिषदेने कुंडलिका नदीघाट सुशोभीकरणाचा प्रस्ताव महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडे सादर केला असून, या प्रस्तावाची छाननी करण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.