नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने नेमलेले मुख्य निवडणूक निरीक्षक व राज्याचे कौशल्य आणि उद्योजकता विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी शनिवारी (दि.४) निवडणुकीच्या एकूणच कामकाजाचा आढावा घेत काही सूचना केल्या.निवडणूक आयोगाने दीपक कपूर यांच्यासह निवडणूक निरीक्षक म्हणून उपआयुक्त पी. बी. वाघमोडे, नंदुरबारचे अपर जिल्हाधिकारी अनिल पाटील, उपआयुक्त डॉ. संजय कोलते आणि नगरचे अपर जिल्हाधिकारी बी. एच. पालवे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यातील मुख्य निवडणूक निरीक्षक दीपक कपूर यांनी शनिवारी नाशिकला येऊन सहाही विभागीय कार्यालयातील निवडणूक कक्षांना भेटी देत पाहणी केली व कामकाजाची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण होते. त्यानंतर दुपारी सर्व निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कपूर यांनी आचारसंहितेची काटेकोर अमंलबजावणी करण्यासंबंधी सूचना केल्या.
मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून आढावा
By admin | Updated: February 4, 2017 22:10 IST