शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचा-यांचा संप स्थगित, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांसोबतच्या चर्चेनंतर घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 04:46 IST

राज्यातील महसूल कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेने संप स्थगित केल्याचे सायंकाळी जाहीर केले.

मुंबई : राज्यातील महसूल कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेने संप स्थगित केल्याचे सायंकाळी जाहीर केले. याबाबत मंत्रालयात महसूल मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेबरोबर बैठक झाली.विविध मागण्यांसाठी राज्यातील महसूल कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले होते. महसूल लिपीकाचे पदनाम बदलण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. अव्वल कारकून संवर्गातील वेतनश्रेणीतील त्रुटी व नायब तहसीलदार संवर्गाचा ग्रेड पे वाढविण्यासंदर्भात राज्य वेतन सुधारणा समितीकडे संघटनेने मागणी केल्यास त्याला पाठिंबा देण्यात येईल. शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नतीसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्यासंदर्भात सहमती असून यासंबंधीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविणे, पुरवठा विभागातील निरीक्षकांची पदे शंभर टक्के बदली व पदोन्नतीने भरण्यास व त्यासंदर्भात सेवा प्रवेश नियमात बदल करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली.सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे संघटनेने संप स्थगित केल्याचे पत्र महसूल मंत्री पाटील यांना देण्यात आले. यावेळी महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, संघटनेचे कार्याध्यक्ष द. मा. देशपांडे, सरचिटणीस हेमंत साळवी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.महसूलमंत्र्यांना पत्र-विविध मागण्यांसाठी राज्यातील महसूल कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले होते. परंतु, आता याप्रकरणी सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे संघटनेने संप स्थगित केल्याचे पत्र महसूल मंत्री पाटील यांना देण्यात आले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील