शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

महसूल लिपिक बनले ‘महसूल सहायक’; अनेक वर्षांची मागणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 02:22 IST

गेल्या वर्षी ४ जुलैला राज्य शासनासोबत चर्चा झाली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदनामबदलाची मागणी मान्य असल्याचे लेखी पत्र राज्य महसूल संघटनेस दिले होते.

सुरेश लोखंडे ठाणे : प्रलंबित असलेल्या प्रमुख मागण्यांपैकी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेच्या लिपिकाचे पदनाम बदलण्याची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. राज्य शासनाने २० आॅगस्टला जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ‘महसूल सहायक’ असे या पदाचे नामकरण करण्यात आले आहे, असे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हा शाखेचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रशांत कापडे, भास्कर गव्हाळे यांनी सांगितले.

राज्य शासनाचे सहसचिव डॉ. संतोष भोगले यांनी गुरुवारी डिजिटल स्वाक्षरीद्वारे महसूल शाखेच्या लिपिकाचे पदनाम ‘महसूल सहायक’ केल्याचा आदेश जारी केला आहे. वास्तविक, ही मागणी राज्य संघटनेतर्फे १९८७ पासून करण्यात येत होती. यासाठी १९९५ मध्ये तत्कालीन सुनील जोशी, रवींद्र देशमुख, आर.जे. पाटील आदी ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली १० दिवसांचा संपही झाला होता, असेही कापडे यांनी सांगितले.

प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जुलै २०१९ पासून कालबद्ध आंदोलनाचा कार्यक्रम राज्य संघटनेने जाहीर केला होता. त्यानुसार, ४ सप्टेंबर २०१९ रोजी अपर मुख्य सचिव, महसूल यांच्या अध्यक्षतेखाली इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संघटनेसोबत १९ प्रलंबित मागण्यांपैकी प्रमुख १३ मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात बैठक ठेवली होती. २० आॅगस्टला झालेल्या निर्णयानुसार पदनाम बदलण्याची मागणी पूर्ण झाली.

गेल्या वर्षी ४ जुलैला राज्य शासनासोबत चर्चा झाली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदनामबदलाची मागणी मान्य असल्याचे लेखी पत्र राज्य महसूल संघटनेस दिले होते. मात्र, राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यावर त्यांच्याकडे या मागणीसाठी सतत पाठपुरावा केला होता.महसूल कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण'लिपिक'पदाचे आता 'महसूल सहायक’ असे नामकरण झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील महसूल कर्मचारी व अधिकारी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याबद्दल राज्य महसूल संघटनेचे मागील सर्व पदाधिकारी, विद्यमान पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व कर्मचारी यांनी राज्य महसूल संघटनेवर विश्वास दर्शवून पाठिंबा देऊन सर्वांची साथ आणि सहयोग व मार्गदर्शन मिळाल्याने आम्ही राज्य महसूल संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, अपर मुख्य सचिव, महसूल व वित्त सचिव, सचिव सामान्य प्रशासन आदींचे राज्य महसूल संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत, असे कापडे यांनी सांगितले.

टॅग्स :State Governmentराज्य सरकार