शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

अभियांत्रिकीचे प्राचार्य, प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 19:46 IST

प्राचार्य अथवा प्राध्यापकांचे निवृत्तीचे वय वाढविणे किंवा कमी करणे हे अधिकार शासनाला आहे.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६२ व ६० वरून ७० व ६५ वर्षे अनुक्रमे केले आहे. असाधारण दिशानिर्देश ५०/२०१९ अन्वये १३ डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले आहे. शासनाची परवानगी न घेता वय वाढविल्याप्रकरणी राज्यपालांकडे तक्रार करण्यात आली असून, याबाबत संभ्रम दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे संचालक नितीन हिवसे यांनी अमरावती विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाची तक्रार केली आहे. प्राचार्य अथवा प्राध्यापकांचे निवृत्तीचे वय वाढविणे किंवा कमी करणे हे अधिकार शासनाला आहे.मात्र, अमरावती विद्यापीठाने दिशानिर्देशाचा आधार घेत अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६२ वरून ७० आणि प्राध्यापकांचे ६० वरून ६५ वर्ष वाढविली आहे. या दिशानिर्देशामुळे निवृत्ती संबंधी महाविद्यालयीन प्रशासन आणि संस्था चालकांची अडचण झाली आहे. त्यामुळे संस्थाचालकांनी शासन की, विद्यापीठ कुणाचे नियम पाळावे, ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. राज्यात इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांत शासन नियमानुसार निवृत्तीचे वय ग्राह्य धरण्यात येते. अमरावती विद्यापीठाने निर्गमित केलेल्या अध्यादेशाने अभियांत्रिकी महाविद्यालयांत एकच गोंधळ उडाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांचे निवत्ती वयाबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नसताना अचानक अमरावती विद्यापीठाने निवृत्तीचे वय बदलविल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. हा संभ्रम राज्यपालांनी दूर करावा, अशी मागणी नितीन हिवसे यांनी केली आहे. याप्रकरणी केंद्र व राज्य शासनाकडे तक्रार पाठविली आहे.      २३ अभियांत्रिकीमध्ये संभ्रमाची स्थितीअमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांत २३ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. विद्यापीठाने दिशानिर्देश जारी करून प्राचार्य, प्राध्यापकांच्या निवृत्तीत वाढ केल्यामुळे महाविद्यालयीन प्रशासन गोंधळले आहे. नेमके निवृत्तीचे वय कोणते ग्राह्य धरावे, याबाबत स्पष्टता नाही. संस्थाचालकही ठोस निर्णय घेऊ शकत नाही, हे वास्तव आहे. आता याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

विद्यापीठाकडे उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे दिशानिर्देश काढले आहे. प्राध्यापकांना एआयटीसी वेतन देते, राज्य शासन देत नाही. केंद्र शासनाच्या गाइडलाइननुसार कार्यवाही करण्यात आली आहे.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ