शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त शिक्षकासही चौकशी समितीत नेमता येते

By admin | Updated: March 13, 2016 04:40 IST

खासगी शाळेतील शिक्षकाविरुद्धच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या समितीवर तिसरा सदस्य म्हणून नेमायचा पुरस्कारप्राप्त शिक्षक अथवा मुख्याध्यापक सेवेत असायलाच हवा

मुंबई : खासगी शाळेतील शिक्षकाविरुद्धच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या समितीवर तिसरा सदस्य म्हणून नेमायचा पुरस्कारप्राप्त शिक्षक अथवा मुख्याध्यापक सेवेत असायलाच हवा, असे बंधन नाही. सेवानिवृत्त शिक्षक अथवा मुख्याध्यापकासही समितीवर सदस्य म्हणून नेमले जाऊ शकते, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.समितीवर नेमायच्या अशा शिक्षक अथवा मुख्याध्यापकाच्या वयाच्या बाबतीतही ६५ वर्षांची कमाल मर्यादा नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.राज्यातील खासगी शाळांमधील कर्मचाऱ्यांसाठीच्या सेवानियमांत (एमईपीएस रुल्स) नियम ३६ अन्वये चौकशी समिती नेमण्याची तरतूद आहे. त्यात समितीवरील तिसरा सदस्य म्हणून एखादा शिक्षक अथवा मुख्याध्यापक नेमायचा असतो. असा शिक्षक/मुख्याध्यापक सेवेतीलच असावा की सेवानिवृत्तही चालेल, असा मुद्दा उपस्थित झाला होता. न्या. सत्यरंजन धर्माधिकारी, न्या. गौतम पटेल व न्या. ए. के. मेमन यांच्या पूर्णपीठाने त्याचे वरीलप्रमाणे उत्तर दिले. न्यायालयाने म्हटले की, चौकशी समितीवर नेमायचा शिक्षक केंद्र किंवा राज्य सरकारचा पुरस्कारप्राप्त असावा, एवढीच नियमाची अपेक्षा आहे. तो सेवेतील असू शकेल किंवा सेवानिवृत्तही असू शकेल.मात्र, ही नेमणूक करताना जि.प.च्या शिक्षण अधिकाऱ्याने जिल्ह्यातील पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या पॅनेलचे अवलोकन करणे अपेक्षित आहे. नेमल्या जाणाऱ्या या सदस्यावर पक्षपात, पूर्वग्रह अथवा कुहेतूचा आरोप करण्यास जागा राहू नये, यासाठी तो ज्या संस्थेतील शिक्षकाविरुद्ध चौकशी व्हायची आहे, त्या संस्थेच्या सेवत राहिलेला नसावा, अशा सदस्याविरुद्ध फौजदारी खटला किंवा नैतिक अध:पतनाचे आरोप नाहीत ना? याचीही शिक्षणाधिकाऱ्यांनी खातरजमा करावी.वयाच्या बाबतीत पूर्णपीठाने म्हटले की, समितीवर नेमायचा पुरस्कारप्राप्त शिक्षक अथवा मुख्याध्यापक ६५ वर्षांहून अधिक वयाचा नसावा, असे परिपत्रक शिक्षण संचालकांनी मध्यंतरी काढले असले, तरी नियमांत मात्र अशी कोणतीही तरतूद नाही. वयाची सरसकट अशी कोणतीही कमाल मर्यादा ठरविता येणार नाही व तसे ठरविणे सयुक्तिकही होणार नाही. मात्र, वाढलेले वय, आजारपण इत्यादींचा विचार करून नेमायचा सदस्य काम करण्यास सक्षम आहे की नाही, याचा निर्णय प्र्रत्येक प्रकरणातील परिस्थिती लक्षात घेऊन केला जावा.पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी (बु.) येथील शिक्षण प्रसारक मंडळाने त्यांच्या शाळेतील रमेश भीमराव नारायणकर या शिक्षकास सेवेतून बडतर्फ केले होते. शालेय न्यायाधिकरणाने नारायणकर यांना पुन्हा कामावर घेण्याचा आदेश दिला. त्याविरुद्ध संस्थेने केलेल्या रिट याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाच्या दोन एकल न्यायाधीशांनी परस्परविरोधी निकाल दिल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शालेय न्यायाधिकरणापुढे गोंधळाची स्थिती निर्माण होत असल्याचे नमूद करून, चार वर्षांपूर्वी हा मुद्दा निर्णायक निकालासाठी पूर्ण पीठाकडे सोपविला गेला होता. (विशेष प्रतिनिधी)