शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

By admin | Updated: June 5, 2016 18:19 IST

बहुप्रतीक्षित दहावी इयत्तेचा निकाल 6 जूनला म्हणजेच उद्या जाहीर होणार असल्याची माहिती पुणे शिक्षण मंडळानं दिली आहे.

 ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 5- बहुप्रतीक्षित दहावी इयत्तेचा निकाल 6 जूनला म्हणजेच उद्या जाहीर होणार असल्याची माहिती पुणे शिक्षण मंडळानं दिली आहे. दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीनं जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2016 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल सोमवारी, 6 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना 15 जूनला गुणपत्रिका मिळणार आहे, असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी कळविले आहे. 
राज्य मंडळाच्या पुणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्गत राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. राज्य मंडळाने निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा केली असून, विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर व मोबाईलद्वारे निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना 15 जून रोजी गुणपत्रिकेबरोबर कलचाचणीचा कल अहवालाचेही वाटप केले जाणार आहे. 
 
(गेल्या वर्षी दहावीचा निकाल ९४.७७ टक्के)
 
यंदा दहावीला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले असून, निकालाची तारीख जाहीर झाल्यानं 10वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यमंडळ कार्यालयातील 'शारदा' सभागृहात दहावीच्या निकालासंदर्भात उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदही आयोजित केली आहे. पत्रकार परिषदेत शिक्षण मंडळाकडून राज्यातील टक्केवारीसंदर्भात माहिती देण्यात येणार आहे.
 दहावीचा निकाल एसएमएसद्वारे मोबाईलवरही समजणार आहे. निकाल जाणून घेण्यासाठी बीएसएनएल धारकांनी mhssc असा मॅसेज 57766 या नंबरवर करायचा आहे. तर एअरटेल धारकांनी MAH10सह 5207011 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा डोकोमो, टेलिनॉर कंपनीच्या धारकांनी MAH10 असा मॅसेज टाईप करून 58888111 या नंबरवर पाठवल्यास तात्काळ निकाल समजणार आहे. 
 
या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध असणार
 
www.mahresult.nic.in 
www.result.mkcl.org 
www.maharashtraeducation.com 
www.rediff.com/exams 
http://maharashtra10.jagranjosh.com