शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

By admin | Updated: May 17, 2017 18:29 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला आहे

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 17 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला आहे. इयत्ता पाचवीचा २१.४३ टक्के तर आठवीचा १३.४५ टक्के निकाल लागला आहे. परिषदेच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.राज्यात पहिल्यांदाच इयत्ता पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली आहे. यापुर्वी इयत्ता चौथी व सातवीसाठी ही परीक्षा घेतली जात होती. यावर्षी दि. २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या परीक्षेत विविध बदलही करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. इयत्ता पाचवीच्या परीक्षेसाठी ५ लाख ४५ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ लाख २६ हजार ५९७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यामधील १ लाख १२ हजार ८५६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेचा निकाल २१.४३ टक्के इतका लागला आहे. इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी केवळ ५२ हजार ५६७ विद्यार्थी पात्र ठरले असून परीक्षेचा निकाल १३.४५ टक्के लागला आहे. दोन्ही परीक्षांचा सरासरी निकाल १८.०३ टक्के एवढा आहे. राज्यात पाचवी व आठवीतील एकुण १ लाख ६५ हजार ४२३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. विविध तांत्रिक कारणांमुळे ६३६ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आला आहे.------------------अंतिम निकाल १५ जुनपर्यंतविद्यार्थ्यांना परिषदेच्या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निकालाविषयी काही हरकती असल्यास निकालाच्या छायांकित प्रतीसह दि. ३१ मेपर्यंत परिषदेकडे अर्ज करता येणार आहे. तसेच गुणपडताळणी करण्यासाठीही अर्जाची मुदत दि. ३१ मेपर्यंत राहील. आलेल्या हरकतींचा विचार करून दि. १५ जूनपर्यंत अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. यावेळी शिष्यवृत्ती कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार, हे स्पष्ट होईल,असे परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी सांगितले.------------------------------------------------------------शिष्यवृत्ती परीक्षेचा निकालइयत्तापाचवीआठवीएकुण विद्यार्थ्यांची नोंदणी ५,४५,८८१४,०३,३०१९,४९,१८२उपस्थिती५,२६,५९७३,९०,८५५९,१७,४५२गैरहजर१९,२८४१२,४४६३१,७३०राखीव३७८२५८६३६पात्र१,१२,८५६५२,५६७१,६५,४२३अपात्र४,१३,३६३३,३८,०३०७,५१,३९३पात्रतेची टक्केवारी२१.४३१३.४५१८.०३---------------------------------------------------------------संकेतस्थळ -  www.mscepune.in-----------------------------------------------------निकालात मोठी घटयंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अनुक्रमे ५६.९४ व ४२.९६ टक्के इतका लागला होता. त्यातुलनेत इयत्ता पाचवी व आठवीच्या परीक्षेचा निकाल खुप कमी लागला आहे. पाचवीचा निकाल २१.४३ व आठवीचा १३.४५ टक्के निकाल लागला असून चौथी व सातवीच्या तुलनेत त्यात अनुक्रमे ३५.५१ व २९.५१ टक्के घट झाली आहे. याविषयी बोलताना डेरे म्हणाले, यावर्षी पहिल्यांदाच परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकांचे ए, बी, सी, डी असे चार संच तयार करण्यात आले होते. त्यामुळे परीक्षेत गैरप्रकारांना आळा बसला. परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. पुर्वी दोन्ही पेपरमधील गुणांची एकत्रित करून उत्तीर्ण केले जात होते. आता त्यात बदल करण्यात आला असून दोन पैकी एका पेपरमध्ये १५० पैकी ४० गुण न मिळालेल्या विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. तसेच आठवीसाठी २० टक्के प्रश्नांना उत्तरांचे दोन पर्याय देण्यात आले होते. त्यामुळे निकालात घट झाल्याचे दिसून येते, असे डेरे यांनी नमुद केले.