शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

नोटा बदलाचा पर्यटन स्थळावर परिणाम

By admin | Updated: November 13, 2016 17:30 IST

केंद्र सरकारच्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा परिणाम राज्यातील पर्यटन स्थळांवरही जाणवत आहे

ऑनलाइन लोकमत/ब्रह्मानंद जाधवबुलडाणा, दि. 13 - केंद्र सरकारच्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा परिणाम राज्यातील पर्यटन स्थळांवरही जाणवत आहे. पर्यटन स्थळाच्या परिसरात ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद केल्याने पर्यटकांच्या संख्येत घट झाली असून सुट्टीच्या दिवसातही पर्यटनस्थळी शुकशुकाट दिसून येत आहे. राज्यातील विविध धार्मिक स्थळे ऐतिहासिक महत्वाची ठिकाणे, समुद्र किनारे, डोंगरदऱ्या आणि जंगले या ठिकाणी दिवाळीच्यानंतर व सुट्टीच्या दिवसात पर्यटकांचा ओघ वाढतो. पश्चिम विदर्भातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुद्धा कंबर कसली आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशिम या जिल्ह्यांसाठी महामंडळाने अमरावती येथे गतवर्षी प्रादेशिक कार्यालय स्थापन केले असून त्या कार्यालयामार्फत महामंडळाच्या विविध योजना राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये निवास व न्याहारी योजना, महाभ्रमण योजना यांसारख्या विविध योजनांचा समावेश आहे. या योजनांमुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे.  पर्यटकांचा ओघ फक्त काही हंगामापुरता असतो, त्यामुळे यावर्षी दिवाळीपासून राज्यातील विविध तीर्थस्थाने, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक महत्वाची ठिकाणे, समुद्र किनारे, डोंगरदऱ्या आणि जंगले या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढला होता. परंतू ८ नोव्हेंबर रोजी अचानक केंद्र सरकारने ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे  ८ नोव्हेंबरला रात्रीपासूनच पर्यटन स्थळाच्या परिसरात ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद झाले. परिणामी पर्यटन स्थळावर असलेल्या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद न घेताच माघारी परतावे लागले. राज्यातील सर्वच पर्यटनस्थळी ५०० व एक हजार रुपये घेतले जात नसल्याने दुरवरून आलेल्या पर्यटकांची मोठी अडचण निर्माण झाली होती. नोटा बंदच्या या निर्णयाने सध्या पर्यटन स्थळावरील पर्यटकांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. एैन सुट्टीच्या काळात पर्यटकांची संख्या घटल्याने पर्यटन स्थळ परिसरातील व्यावसायीकांना मोठा फटका बसला आहे.  सुट्टीचा हंगाम गेला खालीपर्यटन स्थळावर पर्यटकांचा ओघ फक्त काही हंगामापुरताच राहतो. ११ नोव्हेंबरला कार्तिक मासातील एकादशी असल्याने या दिवशी राज्यातील विविध तीर्थस्थाने व धार्मिक स्थळी गर्दी राहील असा अंदाज होता; मात्र  ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बंदमुळे धार्मिक स्थळी कार्तिक एकादशीला भाविकांची संख्या कमी दिसून आली. त्यानंतर १२ नोव्हेंबरला महिन्यातील दुसरा शनिवार, १३ नोव्हेंबरला रविवारची साप्ताहीक सुट्टी व १४ नोव्हेंबरला   गुरूनानक जयंतीची सुट्टी अशाप्रकारे तीन दिवस सलग सुट्टी येऊन सुद्धा पर्यटन स्थळावर पर्यटकांचा ओघ वाढत नसल्याचे दिसून येत आहे. ५०० किंवा एक हजार रुपयांचीच खरेदी करा !केंद्र सरकारचा ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा रद्दचा निर्णय धडकताच पर्यटन स्थळावर आलेल्या पर्यटकांची मोठी अडचण निर्माण झाली. पर्यटनस्थळाच्या परिसरातील व्यावसायिकांकडून पर्यटकांना ५०० किंवा एक हजार रुपयांचीच खरेदी करण्याचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे १०० रुपयांच्या वस्तूसाठी पर्यटकांना ५०० रुपयांची खरेदी करावी लागत आहे.