शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

गणवेश घातला नाही म्हणून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, वीडियो व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 16:29 IST

श्यामकुमार पुरे / ऑनलाइन लोकमत सिल्लोड, दि. 19 - सिल्लोड येथील वरुड काजी रोडवर असलेल्या इंग्रजी माध्यमातील शाळेच्या शिक्षकाने एका ...

श्यामकुमार पुरे / ऑनलाइन लोकमत

सिल्लोड, दि. 19 - सिल्लोड येथील वरुड काजी रोडवर असलेल्या इंग्रजी माध्यमातील शाळेच्या शिक्षकाने एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जि. ए. शहा यूनिव्हर्सल अॅकेडमी इंग्रजी शाळेत 10 दहावीच्या विद्यार्थ्यांने शाळेचा गणवेश घातला नाही म्हणून शाळेच्या प्रचार्याने त्याला वर्गातून कॉलर व केस पकडून कुत्र्या सारखे ओढ़त आणून रिसेप्शन वर बेदम मारहाण केली. या घटनेमुळे मुलगा डिप्रेशन मध्ये गेला असून त्यांच्या जिवाला धोका आहे. अशी तक्रार मुलाच्या वडिलांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी बालसंरक्षण अधिनियम कलम 23 नुसार त्या प्राचार्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या मारहानीचा वीडियो सर्वत्र व्हायरल झाला आहे. मारहाण झालेल्या मुलाचे नाव डेविड प्रवीणभाई वनकर पटेल रा. देवळा. ता. कुतीबाजार.जिल्हा पोरबंदर राज्य गुजरात.हल्ली मुकाम सिल्लोड असे आहे.मुलाचे वडील प्रवीणभाई खिमजी वनकर वय 43 यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की,13 जुलै रोजी माझा मुलगा डेविड शाळेत गेला असता शाळा भरल्यावर वर्गात 10 ते 10.30 वाजता शाळेचे प्राचार्य राहुलदेव भगत वर्गात आले. त्यांनी सर्व मुला समोर डेविडची कॉलर, व केस पकडून जोरजोरात आरडा ओरड करुण दमदाटी करून मारहाण करीत त्याला वर्गातून ओढ़त रिसेप्शन पर्यन्त आनले.व बेदम मारहाण केली. यामुळे माझा मुलगा डिप्रेशन मध्ये गेला आहे. तो 14 तारखे पासून शाळेत गेला नाही.म्हणून मी त्याची रजा मंजूर करुण घेतली आहे. मी घटनेच्या दिवशी कुटुंबा सोबत खुलताबाद येथे दर्शनसाठी गेलो होतो. घरी आल्यावर मुलाने आई मधुबाई हिला घडलेली हकिगत सांगितली यावरून घटना उघड़कीस आली.टीसी देण्याची धमकी देवून माफ़ी नामा घेतला...डेविडला बेदम मारहाण करुण प्राचार्यानी उलट त्याला टीसी देवून शाळेतुन काढून टाकन्याची धमकी दिली. व बळजबरी माफ़ी नामा लिहून घेतला. या माफिनाम्यात मी शाळेत सभ्यवर्तन करेल... शिक्षकांशी चांगला वागेल गैर वर्तन करणार नाही.. एकदा मला माफ़ करा असे लिहिले आहे.उड़वा उडविचे उत्तर दिले...मुलाला शाळेत बेदम मारहाण का केली यांचे जाब प्राचार्याना विचारले असता त्यांनी उड़वा उडविचे उत्तर दिले...- मधुबाई प्रवीण वनकर आईमुलगा डिप्रेशन मध्ये आहे...माझ्या मुलाला प्राचार्याने सर्व मुलांच्या समोर वर्गातून ओढून आणून दंमदाटी करुण बेदम मारहाण केली आहे. मुलांसमोर त्याचा अपमान झाल्याने तो डिप्रेशन मध्ये आहे.शाळेत जात नाही ...घाबरला आहे. त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्याला योग्य न्याय मिळाला पाहिजे...- प्रवीण खिमजी वनकर वडील रा.देवळा राज्य गुजरात. हल्ली मुकाम सिल्लोड.शिक्षक नसल्याची केली होती तक्रार10 विला एकूण 5 शिक्षक आहेत पैकी 3 शिक्षक नियमीत वर्गात क्लास घेतात..इतर इंग्रजी, हिस्ट्री, चे दोन्ही शिक्षक तीन चार दिवसा आड़ वर्गावर येतात यांची तक्रार मी व माझ्या पालकानी शाळेत आयोजित पालक मेळाव्यात केली. होती तेव्हा पासून मला धारेवर धरन्यात येत होते.. तो राग मनात धरून मला ही मारहाण करण्यात आली आहे.- डेविड प्रवीणभाई वनकर पटेल. विद्यार्थी वर्ग 10 वी.बळजबरी घेतला माफ़ी नामामी शाळेत कोणतेही गैर वर्तन केले नाही.. केवळ शाळेचा गणवेश घातला नव्हता... यामुळे मला अपमानित करून बेदम मारहाण केली. व उलट टीसी देण्याची धमकी देवून बळजबरी माफ़ी नामा लिहून घेतला.- डेविड प्रवीणभाई वनकर पटेल. विद्यार्थीमारले नाही... ओरडलो...तो विद्यार्थी वर्गात अध्यापन करणाऱ्या शिक्षकां सोबत उद्धट पणे वागत होता... शिक्षकांच्या तक्रारी आल्याने मी वर्गात गेलो... त्याने माझ्या सोबत पण उद्दट पणा केला... मी त्याला वर्गातून समज देण्यासाठी माझ्या क्याबिन मध्ये आणले. मी त्याला मारले नाही... केवळ त्यांच्यावर ओरडलो...तुला टीसी देतो असे सांगितले ...त्याने माफ़ी मागितली व यानंतर असे वागनार नाही... सर्वांचा आदर करेल असे हमी पत्र लिहून दिले. त्यात त्याने ङ्मु्र्िरंल्ल३ लिहिल्याने मी विद्यार्थ्या समोर त्याचे स्वागत केले. इतर होत असलेले आरोप खोटे आहे.- राहुलदेव भगत प्राचार्य जी.ए. शहा इंग्लिश स्कुल सिल्लोड.
https://www.dailymotion.com/video/x8458n1