शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

घरफोडीच्या खटल्याचा एका दिवसात निकाल

By admin | Updated: January 23, 2017 20:37 IST

न्यायालयांनी आता पुर्वीच्या पद्धतीत अमुलाग्र बदल करून जलदगती न्यायदानास प्रारंभ केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 23 -  ‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’असे उपहासाने म्हटले जाते, यामागे बहुधा न्यायदानास होणारा विलंब कारणीभूत असावा. मात्र; न्यायालयांनी आता पुर्वीच्या पद्धतीत अमुलाग्र बदल करून जलदगती न्यायदानास प्रारंभ केला आहे.  नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एम. बुक्के यांनी सोमवारी एकाच दिवसात इंदिरानगरमधील घरफोडीच्या गुन्ह्यातील एका खटल्यात सर्व साक्षीदार तपासून सराईत घरफोड्यास शिक्षा सुनावली आहे. नाशिक न्यायालयातील हा पहिलाच जलदगती न्याय असल्याचे सांगितले जाते आहे.
या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, २० नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील पुजा एंटरप्रायजेस या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील १३ हजार ४०० रुपयांची चोरी करण्यात आली होती़ ही चोरी करताना वडाळा गावातील सराईत घरफोड्या तथा तडीपार विशाल वसंत बंदरे ऊर्फ इंद्या यास रंगेहाथ पकडण्यात आले होते़ तर त्याचा फरार साथीदार शरद अशोक कांबळे (रा़भय्यावाडी, रंगरेज मळा, नाशिक) यास इंदिरानगर पोलिसांनी अवघ्या दोन तासात त्याच्या घरातून अटक केली़ यामध्ये कांबळेला दोन दिवसांनी जामीन मिळाला तर इंद्या तेव्हापासून कारागृहात आहे़ पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये १२ जानेवारी रोजी आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.
मुख्य न्यायदंडाधिकारी बुक्के यांनी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास या खटल्यातील साक्षीदारांचा जबाब घेण्यास प्रारंभ केला़ सरकारी वकील स्वाती दांडेकर यांनी या खटल्यातील सातही साक्षीदारांच्या साक्ष पूर्ण करून इंद्या व कांबळेविरूद्ध सबळ पुरावे सादर केले.  तर बचाव पक्षाचे वकील एक़े क़ाळे यांनी इंदिरानगरचे सहायक पोलीस उपनिरीक्षक तथा तपासी अधिकारी संदीप वऱ्हाडे यांची दीड तास उलटतपासणी घेतली. वऱ्हाडे यांनी इंद्या हा सराईत गुन्हेगार असून तडीपार असताना त्याने शहरात दाखल होऊन गुन्हा केल्याची साक्ष दिली.
 या खटल्यात समोर आलेल्या साक्षी पुराव्यानुसार मुख्य न्यायदंडाधिकारी बुक्के यांनी आरोपी विशाल बंदरे ऊर्फ इंद्या व अशोक कांबळे या दोघांनाही दोषी ठरवून सायकाळी सहा वाजता तीन महिने सक्तमजुरी व शंभर रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली़ एकाच दिवसात सर्व साक्षीदार तपासून शिक्षा सुनावल्याची नाशिकमधील ही पहिलीच शिक्षा असल्याची चर्चा न्यायालय वर्तुळात आहे.(प्रतिनिधी)