शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

निर्बंधांचे थर गडगडले, 'निषेधा'ची हंडी फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 19:50 IST

गोविंदा पथकांनी काळ्या फिती बांधून, काहींनी शिडीवर चढून हंडी फोडून तर काहींनी जमिनीवर झोपून हंडी फोडत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध केला.

स्नेहा मोरे

 मुंबई, दि. 25 - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधानंतर निर्णयाच्या तडजोडीसाठी धावपळ करणाऱ्या गोविंदा पथकांनी अखेर गुरुवारी नियम पायदळी तुडविले. सकाळपासून गोविंदांनी जागेवाल्यांच्या हंड्या फोडून इतर हंड्या फोडण्यास मार्गक्रमण केले. काही गोविंदा पथकांनी काळ्या फिती बांधून, काहींनी शिडीवर चढून हंडी फोडून तर काहींनी जमिनीवर झोपून हंडी फोडत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध केला. गोविंदा पथकांनी पत्करलेला या ह्यनिषेधास्त्रह्ण पद्धतीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.गेल्या २ वर्षांपासून दहीहंडी उत्सवावरील वादाचे सावट यंदा अधिकच दाट झाले होते. १८ वर्षांखालील गोविंदांच्या सहभागावर सर्वोच्च न्यायालयाने घातलेली बंदी आणि २० फूट थरांच्या उंचीच्या मर्यादेने गोविंदा पथकांमध्ये कमालीचे नाराजीचे वातावरण पसरले होते. याच नाराजीचा उद्रेक गोपाळकालाच्या दिवशी दिसून आला. सर्वोच्च न्यायालयाचे नियम अक्षरश: पायदळी तुडवत गोविंदा पथकांनी ह्यथरथराटह्ण कायम राखला. गोपाळकालाच्या दिवशी पावसानेही दडी मारल्याने यंदा हा उत्सव कोरडाच साजरा झाल्याचे दिसून आले.

यंदाच्या वर्षी शहर-उपनगरात तुलनेने मोठ्या आयोजकांच्या हंड्या कमी असल्याने गोविंदा पथकांनी मुंबईच्या गल्लोगल्ल्यांत जाऊन हंड्या फोडल्या. दादरमध्ये जय हनुमान या जुन्या दहीहंडी पथकाने न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जमिनीवर झोपून नऊ थर रचले. विवेकानंद यूथ कनेक्ट या गोविंदा पथकाने बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यासमोरल चार थरांची सलामी देत उपस्थितांची मने जिंकली. दादर येथे महिला मंडळाच्या गोविंदांची आगळी वेगळी चक्रीहंडी बघायला मिळाली. दहीहंडी फोडण्यासाठी चार फिरत्या थरांची थरारक कसरत यावेळी सादर करण्यात आली. विशेष म्हणजे सर्वांत वरच्या थरावर जाणाऱ्या चिमुकल्या बालगोविंदाला पूर्णपणे सुरक्षित असा संरक्षण सूट घालण्यात आला होता. बालगोविंदाचा थर पूर्ण झाल्यानंतर चौफेर फिरत चक्री दहीहंडी साकारण्यात आली. यावेळी उपस्थितांना या बालगोविंदाने सलाम केला, त्यानंतर दहीहंडी फोडली.

एल्फिस्टन येथे मनसेच्या मुनाफ ठाकूर आयोजित दहीहंडी उत्सवात न्यायालयाच्या निषेधार्थ आयोजकांनीच शिडीवर चढून हंडी फोडली. चेंबूरमध्ये दहीहंडी उत्सवात जपानी परदेशी नागरिकांनी सहभाग घेत या उत्सवाचा आनंद लुटला. शिवाय, या चमूमधील काही महिलांनी यावेळी गोविंदा पथकांतील तरुणांना राख्या बांधून रक्षाबंधनही साजरे केले. बोरीवली येथे प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी आयोजनात नियम मोडल्याचे दिसून आले. चेंबूरमध्ये मनसेचे पदाधिकारी कर्ण दुनबळे यांच्या दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकाने आठ थर रचून नियमांचे उल्लंघन केले. जोगेश्वरी परिसरात साईराम गोविंदा पथकाने डोळ्यावर काळी पट्टी बांधून चार थरांची सलामी दिली. तर गोरेगावच्या गावदेवी महिला गोविंदा पथकाचीही पाच थरांची हंडी फोडत उंची आणि १८ वर्षांखालील गोविंदाच्या सहभागाचे नियम धाब्यावर बसविले.