शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कचरा उचलण्याची जबाबदारी नगरपरिषदेची

By admin | Updated: July 20, 2016 02:31 IST

पनवेल शहरात तालुक्याची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे .

पनवेल : पनवेल शहरात तालुक्याची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे . याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भाजीपाला वितरीत करण्यात येतो. याठिकाणची खराब भाजी व कचऱ्याची विल्हेवाट गाढी नदीच्या पात्रात लावली जात होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने १ जून रोजी ‘पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कचऱ्याची विल्हेवाट गाढी नदीच्या पात्रात’ या मथळ्याखाली बातमी छापली होती. त्या बातमीचे पडसाद मंगळवारी नगरपरिषदेच्या स्थायी समितीत पडलेले पहावयास मिळाले. नगरपरिषदेने याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीला नोटीस बजावली होती. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीला बजावलेली नोटीस चुकीची असून या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नगरपरिषदेची असल्याचा मुद्दा पनवेल नगरपरिषदेत विरोधी पक्षनेते संदीप पाटील यांनी उपस्थित केला. यावेळी लोकमतने छापलेल्या बातमीचा अंक पाटील यांनी सभागृहात फडकवला. ते म्हणाले, महाराष्ट्र नगरपंचायत अधिनियमनुसार नगरपरिषद हद्दीतील कचऱ्याची विल्हेवाट नगरपरिषदेने लावणे गरजेचे आहे. असे असताना नगरपरिषद आपली जबाबदारी झटकून कृषी उत्पन्न समितीला कशी काय नोटीस बजावू शकते? नगरपरिषदेकडून गुजराती स्मशानभूमी याठिकाणी कचरा टाकत येत असून हेही चुकीचे आहे. ही जागा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आरक्षित नसताना हा प्रकार सर्रास सुरू आहे. नगरपरिषदेने कृषी उत्पन्न बाजार समितीला बजावलेली नोटीस ही चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.