शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

मोर्चाला प्रतिसाद हा मराठ्यांना गृहित धरल्याचा उद्वेग - डॉ.जयसिंगराव पवार यांचे मत

By admin | Updated: October 4, 2016 18:30 IST

मराठा समाजातील बहुतेक जण हे शेतकरी आहेत. म्हणजे एकीकडे हा मराठा सर्व समाजाची अन्नधान्याची गरज पूर्ण करतो; तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या सीमेवर शत्रूपासून

- समीर देशपांडे / ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 04 -  मराठा समाजातील बहुतेक जण हे शेतकरी आहेत. म्हणजे एकीकडे हा मराठा सर्व समाजाची अन्नधान्याची गरज पूर्ण करतो; तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या सीमेवर शत्रूपासून तुमचे-आमचे संरक्षण करतो. म्हणजेच एकीकडे आमचे पोट भरणारा आणि दुसरीकडे आमचे संरक्षणही करणारा असा हा मराठा बदलत्या परिस्थितीत चोहोबाजूंनी पिचला आहे. आतापर्यंत अनेक वर्षे मराठ्यांना सर्व पक्षांनी गृहीत धरल्याचा हा परिणाम असल्याचे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.मराठा समाजाच्या बदलत्या परिस्थितीचे विश्लेषण करताना डॉ. पवार म्हणाले, गेल्या ३० वर्षांत सर्वसामान्य मराठा वेगवेगळ्या पद्धतींनी अडचणीत येत गेला. प्रगती झाली नाही का? तर झाली. मात्र शहरी नागरिकांमध्ये मराठ्यांची जी प्रतिमा आहे, तसा मराठा खेड्यांमध्ये सध्या नाही. मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचा सदस्य, सभापती, साखर कारखानदार अशी अनेक सत्तास्थाने मराठ्यांकडे आहेत. मात्र हेच सर्वजण म्हणजे मराठा समाज असे होत नाही. यांच्याही पलीकडे फार मोठा मराठा समाज, जो केवळ आणि केवळ शेतीवर अवलंबून आहे, त्याची अवस्था बिकट आहे. मराठा समाज सर्व पक्षांत विभागला गेला आणि सर्वच पक्षांनी मराठ्यांना गृहीत धरले. ह्यमराठा म्हणजे बागायतदारह्ण असे चित्र पुढे आले. शेकडो टन ऊस घालणारा, चारचाकी गाड्या फिरविणारा मराठा शेतकरी तुलनेत संख्येने कमी आहे. मात्र, दुसरीकडे जिरायतदार शेतकऱ्यांचे बुडीतचे अर्थशास्त्र कुणी पाहतच नाही. अल्पभूधारक मराठा शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. एकीकडे कमी होत जाणारी शेती, दुसरीकडे शेती असूनही त्याला पाण्याची उपलब्धता नाही; तिसरीकडे त्याने पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही, कर्जे काढून शिकविलेल्या मुलाला किंवा मुलीला पाहिजे तेथे प्रवेश मिळेल याची खात्री नाही. प्रवेश मिळालाच आणि तो किंवा ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला किंवा झालीच तर नोकरीची हमी नाही, अशी नकारात्मकतेची मालिकाच सर्वसामान्य मराठ्यांच्या आयुष्यात गेली अनेक वर्षे सुरू आहे. आमच्या आधीच्या किंबहुना आमच्याही पिढीने हे सर्व सहन केले. मात्र आताची पिढी हे सहन करायला तयार नाही. यातूच राज्यभर हे मोर्चे निघत आहेत. राज्यातील जे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, यात बहुतांश मराठा शेतकरीच आहेत. आपला प्यारा जीवही नकोसा वाटावा इतकी विपरीत परिस्थिती मराठा शेतकऱ्यांवर आली असेल तर मग याचा उद्रेक हा होणारच. म्हणजेच सर्वसामान्य मराठा समाजाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सगळं दुखणं लपलं आहे. म्हणूनच केवळ मलमपट्टी न करता हे दुखणं मुळापासूनच बरं करण्यासाठीची तातडीची पावलं आता उचलली गेली पाहिजेत. राजकीय इच्छाशक्ती हवीमराठ्यांची स्थिती काय आहे, याची सर्वांना जाणीव आहे. आपल्यावर वर्षानुवर्षे झालेल्या अन्यायामुळे तो आता पेटून उठला आहे. विशेषत: तरुण आणि तरुणी अधिक पेटून उठल्या आहेत; कारण प्रवेशापासून नोकरीपर्यंत सर्वत्र ते भरडले जात आहेत. त्यामुळे नेत्यांना बाजूला ठेवून त्यांनी ही चळवळ हाती घेतली आणि तिथे आता एवढे विशाल रूप धारण केले आहे की, नेत्यांनाच सहभागी होण्याची आता वेळ आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. त्यासाठी केवळ आणि केवळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. ती असल्यास तमिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी काही अडचण असेल, असे मला वाटत नाही. पुढची पायरी उचलायला लावू नकामराठा समाज हा आतापर्यंत झोपलेल्या ड्रॅगनप्रमाणे होता. तो आता कुठे डोळे चोळत उठायला लागला आहे. तर असे लाखालाखांचे मोर्चे महाराष्ट्रात निघायला लागले आहेत. आत्ताच या सर्व युवाशक्तीला विधायक वळण देण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक ती पावले सरकारने उचलावीत. पारंपरिक समित्या आणि गट स्थापन न करता थेट निर्णय घ्यावा. मात्र तसे न झाल्यास ही मराठा युवाशक्ती पुढची पायरी उचलेल, असे मला वाटते. मात्र शासनाने तिला तशी पायरी उचलायला लावू नये.