जंटलमन हीरो : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीरअनुज अलंकार - मुंबईशशी कपूर यांना उशिरा का होईना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला आहे. खरंतर त्यांची तब्येत ठणठणीत असतानाच त्यांना हा पुरस्कार द्यायला हवा होता. तसे झाले असते तर त्याचा सर्वांना जास्त आनंद झाला असता. या पुरस्कारासाठी गेल्या काही वर्षांपासून सगळ््यात योग्य व्यक्ती तेच होते. मात्र जेव्हा एखाद्या कलाकाराला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळणार असेल आणि तो स्वीकारण्यासाठी त्याचे शरीरच साथ देत नसेल तर त्याहून खेदाची दुसरी गोष्ट काय असू शकते? शशी कपूर हे गेली कित्येक वर्षे आजारी आहेत आणि सार्वजनिक समारंभात सहभागी होण्यासाठी त्यांना व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागत आहे. हा सन्मान त्यांना फार पूर्वीच दिला असता, तर त्याचे महत्त्व वाढले असते. शशी कपूर यांच्यासाठी कपूर घराण्यात जन्माला येणे हे आव्हानात्मकही होते आणि तेवढीच जमेची बाजूही होती. पृथ्वीराज कपूर यांच्यासारखे वडील आणि राजसारखा प्रतिभावान भाऊ असूनही शशी यांनी अभिनय आणि एकंदर कारकीर्दीत आपला वेगळा मार्ग निवडला. या सगळ््यात तिघांचेही आपापसात चित्रपटविषयक दृष्टिकोनात कधीच मतभेद झाले नाहीत. पण वेगळा पर्याय निवडूनही प्रत्येक जण त्यांची तुलना पृथ्वीराज आणि राजशी करण्यासाठी आसुसलेले असल्याने शशींना मोठे आव्हानच होते. ज्या वेळी शशींनी आपले अस्तित्व सिद्ध करून स्वत:ची दखल घेण्यास भाग पाडले, त्या वेळी पृथ्वीराज यांनी काम करण्याचे थांबवले होते. पण राज यांची घोडदौड मात्र वेगाने सुरू होती. राज आणि शशी यांच्यात वैचारिक मतभेद होते, हे त्यांनी अमान्य केले नाहीत. असे नसते तर शशी कपूर व्यावसायिक चित्रपटांमध्ये प्रचंड व्यस्त असल्याचे पाहून राज यांनी वारंवार टोमणे मारले. पण हेच टोमणे शशी यांनी आनंदाने, सहृदयतेने स्वीकारले. त्यांनी मारलेल्या टोमण्यांमुळे शशी यांनी मार्ग बदलल्याचेही कधी घडले नाही. तसेच दोघांमध्ये वाद झाल्याचेही कधी ऐकायला मिळाले नाही. शशी यांनी जवळपास तीन दशके मुख्य अभिनेता म्हणून लोकप्रिय कारकीर्द केली. यादरम्यान अभिनेता, सहकलाकार (अमिताभबरोबर त्यांची जोडी जमली होती) आणि मल्लीस्टारर चित्रपटातही त्यांनी केलेल्या भूमिका पसंतीस उतरल्या. एक अभिनेता म्हणून शशी काम करताना मनोरंजनासाठी जे चित्रपट बनत आहेत ते प्रेक्षकांना आवडत आहेत. मग त्यांना आवडेल ते करायचे असा सहज साधा विचार त्यांनी केला. पण जेव्हा निर्माता म्हणून पाऊल टाकले तेव्हा त्यांनी अनेक जोखमीचे विषय निवडले. बॉक्स आॅफीसवर या चित्रपटांना मोठे यश मिळाले नसले तरी गंभीर चित्रपटांची आवड असणाऱ्यांना मात्र त्यांचे हे चित्रपट आवडले. शशी कपूर यांनी अभिनयात सर्वोत्कृष्ट उडी तर घेतलीच. पण सहजता आणि शालिनतेचे ते प्रतीक आहेत. अभिनेते म्हणून केलेले महत्त्वाचे चित्रपट१९६१ : धर्मपुत्र, चार दिवारी१९६२ : मेहंदी लगे मेरे हाथ, प्रेमपत्र१९६३ : हाऊस होल्डर, ये दिल किसको दू, हॉलीडे इन बॉम्बे१९६४ : बेनजीर१९६५ : वक्त, मोहब्बत इसको कहते हैं, जब जब फूल खिले१९६६ : नींद हमारी ख्वाब हमारे, बिरादरी, प्यार किए जा१९६७ : आमने-सामने, दिल ने पुकारा१९६८ : हसीना मान जाएगी१९६९ : कन्यादान, प्यार का मौसम, एक श्रीमान एक श्रीमती, राजा साहब१९७० : अभिनेत्री, बॉम्बे टॉकीज, सुहाना सफर, माय लव्ह१९७१ : शर्मिली, पतंग१९७२ : सिद्धार्थ१९७३ : आ गले लग जा, नैना१९७४ : मि. रोमियो, वचन, रोटी कपडा और मकान, चोर मचाये शोर१९७५ : दीवार, सलाखे, प्रेम कहानी, चोरी मेरा काम१९७६ : कभी कभी, जय बजरंगबली, फकीरा, नाच उठे संसार१९७७ : फरिश्ता या कातिल, इमान धरम, शंकर दादा, मुक्ती, चोर सिपाही, दुसरा आदमी१९७८ : त्रिशूल, हिरालाल पन्नालाल, अपना खून, सत्यम् शिवम् सुंदरम्. जुनून, अमर शक्ती, फांसी, मुकद्दर, त्रिष्ना१९७९ : सुहाग, काला पत्थर१९८० : दो और दो पांच, काली घटा, कलियुग, शान, स्वयंवर१९८१ : क्रोधी, क्रांती, सिलसिला, बसेरा, मान गए उस्ताद१९८२ : विजेता, नमक हलाल, सवाल, हीट एंड डस्ट१९८३ : घुंघरू, बंधन कच्चे धांगो का१९८६ : न्यू डेली टाइम्स, स्वाती, एक मै और एक तू, इल्जाम१९८७ : सेमी एंड रोजी, प्यार की जीत, सिंदूर, इजाजत१९८८ : डिक्टेटर, १९८९ : क्लर्क१९९१ : अकेला१९९३ : इन कस्टडी (मुहाफिज)१९९६ : गुलेवियरर्स ट्रेवल्स१९९८ : जिन्ना, साईड स्ट्रीटनिर्माता म्हणून केलेले चित्रपटजुनून, कलियुग, ३६ चौरंगीलेन, विजेता, उत्सव, अजूबा (दिग्दर्शक)