शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

जीवनवादाचा सन्मान

By admin | Updated: February 7, 2015 02:11 IST

भालचंद्र नेमाडे यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्कारामुळे महाराष्ट्रातील सर्वांनाच आनंद झाला आहे. त्यातही मला झालेला आनंद अधिक आहे; कारण मी त्यांचा प्रकाशकही आहे आणि मित्रसुद्धा आहे.

नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वांनाच आनंदरामदास भटकळ भालचंद्र नेमाडे यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्कारामुळे महाराष्ट्रातील सर्वांनाच आनंद झाला आहे. त्यातही मला झालेला आनंद अधिक आहे; कारण मी त्यांचा प्रकाशकही आहे आणि मित्रसुद्धा आहे. गेली जवळजवळ ४० वर्षे आम्ही एकत्र काम केले आहे. त्यांच्या पहिल्या कादंबरीपासून आताच्या ‘हिंदू’पर्यंत आम्ही एकत्र आहोत. त्यांचे कवितासंग्रह असोत किंवा अगदी ‘कोसला’चे इंग्रजी भाषांतर असो, हे सगळे आम्ही प्रकाशित केले आहे. त्यामुळे ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांचा सन्मान होत असताना आमचीही मान कुठेतरी ताठ झाल्याचे जाणवते.मला असे वाटते, की पुरस्काराच्या महत्त्वापेक्षा त्यानिमित्ताने त्यांची एकूण जीवनाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे आणि त्यांनी साहित्यात जीवनवाद पुन्हा नव्याने रुजवला तसेच देशीवाद ही एक कल्पना मांडली. या दोन्ही गोष्टींचे त्यांच्या दैनंदिन जीवनात प्रतिबिंब दिसते. ‘मी जे जगतो, ते लिहितो’ ही त्यांची वृत्ती मला भावते. कारण पुष्कळवेळा लेखक खूप चांगले लिहितो; पण त्याचा त्याच्या जीवनाशी काही संबंध नसतो; परंतु नेमाडे यांचे तसे नाही. जीवनाकडे आणि साहित्याकडे पाहण्याचा, तसेच साहित्यात जीवनवादी विचार आणण्याचा त्यांचा वेगळा दृष्टिकोन आहे. ते आपली मते ठामपणे मांडतात. अनेकदा ती लोकांना, मला किंवा तुम्हाला रुचणार नाहीत; पण त्यांची त्यामागची भूमिका अत्यंत स्पष्ट असल्यामुळे ती रोखठोकपणे मांडणे आवश्यकच ठरते. त्याने कधी मतभेद होतील किंवा कुणी दुखावतीलही! पण ती मांडणे हे महत्त्वाचे असते. त्यांच्या लेखनामागे खूप विचार आहे. त्यांच्या पहिल्या पाच कादंबऱ्या या प्रामुख्याने स्वत:च्या आयुष्याबद्दलच्या होत्या; पण त्या आत्मचरित्रात्मक नव्हत्या. प्रत्यक्ष घटनांचा आराखडा तेवढा त्यात होता. त्यामागचा विचार ही त्यांची कादंबरी आहे; त्यातल्या घटना म्हणजे त्यांची कादंबरी नव्हे. त्यांच्या प्रत्येक वाक्यामागचे जे चिंतन आहे ते महत्त्वाचे आहे. ‘हिंदू’ या त्यांच्या कादंबरीचा व्यापच मुळी मोठा आहे़ (शब्दांकन : राज चिंचणकर)मातृभाषा संवर्धन ज्ञानपीठापेक्षा महत्त्वाचे मातृभाषा संवर्धनाचा विषय हा ज्ञानपीठ पुरस्कारापेक्षा महत्त्वाचा असल्याचे मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले. ज्ञानपीठ पुरस्कारांसारखे पुरस्कार मरणोत्तरच मिळतात अशी माझी समज होती, त्यामुळे आता मरण जवळ आले आहे की काय अशी शंकाही मनात येऊन गेली अशी आपल्या खास शैलीतील प्रतिक्रिया नेमाडे यांनी व्यक्त केली. केवळ मराठीचाच कैवार नाही मातृभाषा संवर्धन सभेचा कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठी शाळांच्या अनुदानाचा प्रश्न घेऊन काही व्यक्ती राज्याच्या कानाकोपऱ्यातून शालेय शिक्षणमंत्री, मराठी भाषा विभाग मंत्री विनोद तावडे यांना भेटायला आले होते. मात्र कार्यक्रम काहीसा लांबल्याने वैतागलेल्या तावडे यांनी या व्यक्तींना न भेटताच सभागृह सोडले. शिवाय, सभागृहातून जाता- जाता केवळ मराठीचाच मी कैवारी नव्हे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्नही आमच्यासमोर आहे असे सांगत सभागृह सोडले. या घटनेनंतर, लगचेच कार्यक्रमाचे आयोजक अ‍ॅड. गिरीश राऊत मंचावर धावले. माईक हातात घेत त्यांनी तावडेंच्या वागण्यावर रोष व्यक्त केला.इंग्रजीमुळे नोकरी मिळते ही निव्वळ अंधश्रद्धाइंग्रजीमुळे नोकरी मिळते ही निव्वळ अंधश्रद्धा आहे, याचा समावेश नरेंद्र दाभोलकरांच्या अजेंड्यामध्ये का नव्हता हा प्रश्न सतत भेडसावत राहतो. इंग्रजी हे गांजा, अफूप्रमाणे व्यसन असून त्यावर कायदेशीर बंदी असली पाहिजे, असे मत ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांनी मांडले. दादर सार्वजनिक वाचनालयात मातृभाषा संवर्धन सभा आयोजित केली होती. याप्रसंगी, नेमाडे बोलत होते. बाहेरचे बूट घरात आणू नये, ते बाहेरच असावे. आपणही इंग्रजीचे महत्त्व तेवढेच ठेवले पाहिजे, असे ते म्हणाले.मराठी साहित्याचा सन्मानमराठीतील साठोत्तरी साहित्याने नवनवे प्रवाह निर्माण करीत वाङ्मयात क्रांतिकारी परिवर्तन घडविले आहे. या परंपरेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर होणे हा खऱ्या अर्थाने मराठी साहित्याचाच सन्मान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमाडे यांचे अभिनंदन केले आहे.विशेष गौरव करणार -तावडेमहाराष्ट्र सरकारतर्फे ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांचा भव्य सत्कार केला जाईल, अशी घोषणा मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी केली. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व समीक्षक भालचंद्र नेमाडे यांना साहित्य क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तावडे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.भालचंद्र वनाजी नेमाडेजन्म : २७ मे १९३८, सांगवी, खानदेशसाहित्यप्रकार : कादंबरी, कविता, समीक्षाप्रसिद्ध साहित्यकृती : कोसलापुरस्कार : साहित्य अकादमी शिक्षणखानदेशात मॅट्रिक(१९५५), (बी.ए.१९५९, फर्ग्युसन कॉलेज, पुणे), एम.ए. १९६१, (भाषाशास्त्र, डेक्कन कॉलेज, पुणे), आणि एम.ए., (इंग्रजी साहित्य, मुंबई विद्यापीठ) मुंबई- १९६४. त्यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी मिळाली आहे.व्यवसाय इंग्रजीचे प्राध्यापक : अहमदनगर(१९६५), धुळे (१९६६), औरंगाबाद. (१९६७-७१), आणि १९७४ पासून मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. शेवटी ते मुबई विद्यापीठातील तुलनात्मक साहित्याच्या गुरुदेव टागोर आसनावरून निवृत्त झाले.कोसला पहिली कादंबरी(१९६३)कोसला हे पुस्तक त्यांच्या वयाच्या २५व्या वर्षी प्रकाशित झाले. कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाडयमय प्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते.कोसलानंतर...कोसलाच्या यशानंतर नेमाडेंनी बिढार(१९६७), जरीला(१९७७) व झूल(१९७९) या चांगदेव पाटील या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंबऱ्या लिहिल्या. हिंदू नावाची कादंबरी नेमाडे यांनी लिहिली असून ती जुलै १५, इ.स. २०१० ला पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाली आहे. कादंबरीसोबतच त्यांचे ह्यदेखणीह्णआणि ह्यमेलडी (१९७०) हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत. या कवितासंग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरेही प्रकाशित झाली आहेत.१९६० नंतरचे मराठीतील श्रेष्ठ लेखक अशी भालचंद्र नेमाडे यांची प्रतिमा आहे.कादंबऱ्याकोसला (१९६३)जरीला (१९७७)झूल (१९७९)बिढार (१९६७)हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ (२०११)हूलकवितादेखणीमेलडी (१९७०)समीक्षा टीकास्वयंवरतुकाराममुलाखतीसाहित्याची भाषासोळा भाषणेजन्मगावी आनंदोत्सवभालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या सांगवी बुद्रुक या मूळ गावी आनंदोत्सव साजरा झाला. नेमाडे यांचे प्राथमिक शिक्षण सांगवी बुद्रुक येथे झाले. तर भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले. अनेक साहित्यिकांची खंत असते, की ‘ज्ञानपीठ’ मिळत नाही. पण नेमाडे हे या पुरस्कारास निश्चित पात्र आहेत. - डॉ. सदानंद मोरे, नवनिर्वाचित साहित्य संमेलनाध्यक्षक्क्क्ज्येष्ठ साहित्यिक बा. सी. मर्ढेकर यांच्या तोडीचे काम करणारे नेमाडे हे एकमेव साहित्यिक आहेत. ते प्रक्षुब्ध निबंधकार आहेत. व्यवस्थेविरोधात असंतोष व्यक्त करण्याची त्यांची भाषा आहे. प्रचलित मतांपेक्षा काहीतरी वेगळे मांडताना त्याकडे ‘वाच्यार्थ’ म्हणून न पहाता एका भूमिकेच्या दृष्टीकोनातून पहाणे आवश्यक आहे. - डॉ. द. भि. कुलकर्णी, माजी संमेलनाध्यक्षक्क्क्ामच्यात वैचारिक मतभेद आहेत. ते कमी होतील असे नाही, तर ते राहतीलच. पण तरीही नेमाडे यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार जाहीर होणे हे आनंदाचा क्षण आहे. - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, माजी संमेलनाध्यक्ष क्क्क्डॉ. नेमाडे हे आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ कादंबरीकार आहेत. वास्तविक पहाता त्यांच्या कार्याचा गौरव हा कधीच व्हायला हवा होता. परंतु उशीरा का होईना त्यांच्या कार्याची दखल घेतली. - रावसाहेब कसबे, ज्येष्ठ साहित्यिकक्क्क्गुरू शिष्य आणि वडील-मुलगा असे आमचे नाते आहे. त्यांना हा सन्मान प्राप्त झाल्याने तो आम्हालाच मिळाल्यासारखा आहे. त्यांनी मराठी साहित्याची परंपरा खणखणीतपणे मोडून काढली. ते म्हणजे एक विद्यापीठच आहेत. - राजन खान, ज्येष्ठ साहित्यिक क्क्क्नेमाडे यांच्या लिखाणाला धार असून, प्रतिभा आहे. ‘कोसला’नंतर तरुणाईने त्यांच्याकडून लिखणाची प्रेरणा घेतली. शिवाय त्यांनी संशोधन करून लिहलेली ‘हिंदू’देखील तेवढीच गाजली.- रत्नाकर मतकरी, ज्येष्ठ साहित्यिकक्क्क्नेमाडेंच्या योगदानाची दखल शासनाने घेतली याचा आनंद आहे़ आणि लवकरच नेमाडे त्यांच्या रोखठोक शैलीत पुन्हा भेटतील, अशी आशा आहे़- रा़ ग़ कर्णिक, साहित्यिकनेमाडेंच्या पिढीतला साहित्य सहवास मला लाभला याचा मला आनंद आहे़ त्यांच्यासारखा साहित्यिक मराठी साहित्य विश्वात होणे नाही़ - विजया राजाध्यक्ष, साहित्यिकानेमाडे यांना मिळालेला हा ज्ञानपीठ पुरस्कार आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची येऊ घातलेली प्रक्रिया हा सुवर्ण योग, हा मराठी भाषेचा अनोखा सन्मान आहे़- मधु मंगेश कर्णिकमातृभाषा संवर्धन सभेच्या दिवशी भालचंद्रे नेमाडे यांना हा पुरस्कार जाहीर होणे आणि त्याही पेक्षा ही सभा आणि या सभेचा उद्देश नेमाडे यांना महत्त्वाचा वाटणे यातच सारे काही आले.- अ‍ॅड़ गिरीष राऊतभालचंद्र नेमाडे यांचे अभिनंदन आहे. मात्र हा पुरस्कार यापूर्वीच नेमाडेंना मिळायला पाहिजे होता. - डॉ. विजया वाडयोग्य व्यक्तीला ज्ञानपीठ मिळाले असून, अशा व्यक्तीला ज्ञानपीठ मिळणे म्हणजे सोन्याहून पिवळे आहे. - शिरीष पै (कवयित्री )