शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील रिसॉर्ट्सनी केली कोट्यवधींची वीजचोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 06:39 IST

तपासणी होणार; महावितरणचे अधिकारी सहभागी

यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अनेक रिसॉर्ट्स, अम्युझमेंट पार्क्सनी मल्टिमीटरची शक्कल लढवून गेली आठ ते दहा वर्षे कोट्यवधी रुपयांची वीजबील चोरी केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे धडक मोहिमेद्वारे तपासणीचे आणि जादाचे मीटर्स तत्काळ रद्द करण्याचे आदेश महावितरणच्या मुंबई मुख्यालयाने दिले आहेत.

नाशिकच्या इगतपुरी उपविभागात बरेच रिसॉर्ट्स आहेत. त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक रिसॉर्ट्समध्ये मल्टिमीटरद्वारे ही चोरी झाली आहे. तिथे ५ ते ७ कोटींची वीजबिल चोरी झाल्याचा अंदाज आहे. हे उघड होताच महावितरणच्या दक्षता समितीने नाशिक विभागाचे मुख्य अभियंता, संबंधित अधीक्षक अभियंता व उपविभागीय अभियंता यांची चौकशी केली.

एका रिसॉर्ट मालकाला नियमानुसार एकच वीज मीटर घेता येते. त्यामुळे एका मीटरवर जास्त युनिटचा वापर होऊन वरच्या स्लॅबप्रमाणे व्यावसायिक वापराचे बिल येते. अनेक मीटर लावले तर मात्र, वापर विभागला जाऊन त्यानुसार कमी स्लॅबचे बिल येते.हेच हेरून रिसॉर्ट मालकांनी अनेक मीटर लावून घेतले. रिसॉर्टमधील प्रत्येक खोलीस एक मीटर लावून घेण्याचा प्रताप काही मालकांनी केला. याआधी २०१७ मध्येही असाच प्रकार समोर आला होता, त्यावेळी महावितरणच्या एका कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले. पण वीज बिलचोरी बिनबोभाट सुरू राहिली. त्यावरूनच रिसॉर्ट मालक व महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा दाट संशय आहे.

राज्यात अन्यत्रही अशीच वीजचोरी होत असल्याचा संशय आहे. रिसॉर्ट्स, अम्युझमेंट पार्क यांच्या रुम्स, जिम, स्पा यासाठी वेगवेगळी मीटर्स घेताना महावितरणच्या नियमांची आणि एमईआरसीच्या निर्देशांची पायमल्ली करण्यात आल्याने तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. महावितरणच्या मुख्य अभियंत्यांनी शुक्रवारी सर्व अधीक्षक अभियंत्यांना तपासणीच्या आदेशाचे पत्र पाठविले आहे.

नियमबाह्य प्रकारएकाच व्यावसायिक आवारामध्ये वेगवेगळी मीटर्स देणे हे एमईआरसीच्या दरसूचनेनुसार नियमबाह्य आहे. महावितरणच्या व्यवस्थापनाने या प्रकारांची गंभीर दखल घेतली असून २४ फेब्रुवारीपर्यंत पाहणी करून विस्तृत अहवाल देण्यास सांगितले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज