शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

आरक्षणाच्या गोंधळाने निवड यादी लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 21:07 IST

आयटीआय नियोजित वेळापत्रकानुसार सोमवारीप्रसिध्द केली जाणारी पहिली निवड यादी तीन दिवस लांबणीवर पडली आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 24 -  राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची (आयटीआय) नियोजित वेळापत्रकानुसार सोमवारीप्रसिध्द केली जाणारी पहिली निवड यादी तीन दिवस लांबणीवर पडली आहे. यादी तयार करताना विद्यार्थ्यांची आरक्षणनिहाय निवड न झाल्याचे लक्षात आल्याने ऐनवेळी यादी थांबविण्यात आली आहे. त्यामुळे आता दि. २७ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता ही यादी प्रसिध्द केली जाईल, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
 
राज्यात आयटीआय प्रवेशासाठी संचालनालयामार्फत ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जात होती. या प्रक्रियेअंतर्गत सुमारे १ लाख ३२ हजार जागांसाठी तब्बल ३ लाख १२ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरणे, संस्था व व्यवसायनिहाय पसंतीक्रम देवून अर्ज अंतिम केला आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांची पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड यादी सोमवारी सायंकाळी पाच वाजता संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाणार होती. मात्र, संचालनालयाकडून कोणतेही कारण न देता ही यादी दि. २७ जुलै रोजी प्रसिध्द होणार असल्याचे संकेतस्थळावर म्हटले आहे. 
 
त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. निवड यादीनुसार दि. २५ ते २८ जुलै या दरम्यान संबंधित संस्थेत प्रवेश घेण्याची मुदत देण्यात आली होती. आता निवड यादी प्रसिध्द होण्यासच विलंब लागणार असल्याने प्रवेशाचे पुढील वेळापत्रकही कोलमडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
याविषयी बोलताना संचालनालयाचे प्रभारी संचालक अनिल जाधव म्हणाले, यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी नवीन एजन्सीची नेमणुक करण्यात आली आहे. निवड यादी तयार करताना त्यांच्याकडून आरक्षणाबाबत काही चुका झाल्या आहेत. आरक्षणाच्या प्रमाणानुसार निवड यादी तयार झालेली नाही. यादी तपासली असता त्यामध्ये दोष आढळून आल्याने सोमवारी प्रसिध्द करण्यात आली नाही. एक समिती ही यादी तपासून पुन्हा आरक्षणनिहाय यादी तयार केली जाईल. त्यामुळे यादी लांबणीवर पडली आहे. सर्व चुका दुरूस्त करून दि. २७ जुलैपुर्वीच यादी प्रसिध्द करण्याचा प्रयत्न असेल.