शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीच्या भरपाईवरून विरोधक परिषदेत संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 05:51 IST

  मागील हिवाळी अधिवेशनात बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापूस शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ३५ हजार ५०० रुपयांची तर धान उत्पादकांना १४ हजारांची मदत सरकारने जाहीर केली होती.

नागपूर -  मागील हिवाळी अधिवेशनात बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापूस शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ३५ हजार ५०० रुपयांची तर धान उत्पादकांना १४ हजारांची मदत सरकारने जाहीर केली होती. परंतु ती अद्याप मिळालेली नाही. हे सभागृह खोटे बोलण्यासाठी आहे का? मदत कधी देणार हे आधी जाहीर करा, त्यानंतरच कामकाजाला सुरुवात करा अशी आक्रमक भूमिका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोमवारी विधान परिषदेत घेत यावर २८९ अन्वये चर्चा करण्याची मागणी केली. मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही मागणी फेटाळल्याने विरोधकांनी गोंधळ घातला. दोनदा सभागृहाचे कामकाज तहकूब केल्यानंतरही विरोधकांचा गोंधळ कायम असल्याने सभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात झाल्यानंतर शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले विलास पोतनीस, कोकण पदवीधरमधील निरंजन डावखरे आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले किशोर दराडे यांचा शपथविधी झाला. त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तरे पुकारताच धनंजय मुंडे यांनी बोंडअळी व धान उत्पादक नुकसानग्रस्त शेतकºयांना सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत अद्याप मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. डिसेंबर २०१७ मध्ये याच सभागृहात झालेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारने बोंडअळीसाठी प्रतिहेक्टरी ३७ हजार ५०० आणि धानावर आलेल्या तुडतुडा रोगाच्या नुकसान भरपाईसाठी १४ हजार रुपये देण्याची सरकारने घोषणा केली होती. ते कधी देणार, ते सांगा आणि नंतरच कामकाज करा. मात्र, सभापतींनी प्रश्नोत्तराच्या तासात अशा प्रकारचा प्रस्ताव मांडता येत नसल्याने सांगून तो नाकारला. यावर विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

टॅग्स :agricultureशेतीnewsबातम्या