ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 5 - सध्या राजीनामे खिशातून बाहेर काढले आहेत, बाकीचं उद्धवजींना विचारून सांगतो असे शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत ते बोलत होते.महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकींच्या काळात भाजपाशी युती तोडल्यानंतर शिवसेना मंत्र्यांनी राजीनामे खिशात ठेवून फिरतो, असे शिवसेनेच्या मंत्री सांगत होते. मुंबई महापालिकेतच नव्हे, संपूर्ण राज्यात पारदर्शकता आली पाहिजे, असेही रामदास कदम यावेळी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा असो वा आणखी कुठला, कायम राज्य सरकारला राजीनाम्याची भीती दाखवणाऱ्या शिवसेना मंत्री आता बॅकफूटवर गेले आहेत. दिवाकर रावतेंनी राजीनामा खिशात ठेवून फिरतो, असे म्हटले होते. तेच राजीनामे आता खिशातून काढून ठेवल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.
राजीनामे खिशातून बाहेर काढलेत - रामदास कदम
By admin | Updated: March 5, 2017 19:15 IST