शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

लॉटरीत महिलांना आरक्षण

By admin | Updated: November 15, 2015 02:07 IST

राज्य प्रादेशिक परिवहन विभागामार्फत राज्यात एक लाख नवीन परमिटवाटपाचा कार्यक्रम पुन्हा एकदा हाती घेण्यात आला आहे.

ठाणे : राज्य प्रादेशिक परिवहन विभागामार्फत राज्यात एक लाख नवीन परमिटवाटपाचा कार्यक्रम पुन्हा एकदा हाती घेण्यात आला आहे. यंदा यातून शैक्षणिक अटीला पूर्णविराम देऊन महिलांना ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुरुषांच्या जोडीने महिला रिक्षाचालकांची संख्याही वाढणार आहे. या संधीचा महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन आरटीओने केले आहे.तब्बल १६ वर्षांनंतर म्हणजे २०१४ मध्ये वितरीत झालेल्या रिक्षा परमिटवाटप कार्यक्रमात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) बनावटगिरीला आळा घालण्यासाठी परमिटवर होलोग्राम लावून त्यात पारदर्शकता आणली. तसेच ते वाटप करताना परमिटधारकांच्या वारसदारांची माहिती घेण्यासाठी विशेष सिस्टीमही तयार केली आहे. त्याचबरोबर गाडीत परमिटची रंगीत प्रत ठेवण्यास सांगितले. ठाणे शहरात जुने २७ हजार परमिट असून २०१४ मध्ये ३ हजार ७४७ नव्या परमिटची भर पडली आहे. ते देताना शासकीय अटीनुसार यंदा शैक्षणिक अटीला पूर्णविराम देऊन उर्वरित अटीतील गुन्हेगारी रेकॉर्ड, अर्जदार शासकीय नोकरदार आहे का, तो १५ वर्षांपासून ठाण्यात वास्तव्य करतो का, त्याच्याकडील वाहन परवान्यासह बॅज आदी बाबींची छाननी करण्यात येणार असल्याची माहिती आरटीओने दिली. (प्रतिनिधी)येत्या २३ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान नवीन रिक्षा परमिटचे लॉटरी पद्धतीने वितरण होणार आहे. या वेळी शैक्षणिक अट रद्द केली आहे. त्याचबरोबरीने या लॉटरी पद्धतीत महिलांना ५ टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे महिलांनी सहभागी व्हावे.- विकास पांडकर, ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी