राज्यात काही दिवसातच जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. यासाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अध्यक्षपदाच्या आरक्षणाची मोठी चर्चा सुरू होती. दरम्यान, आज महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ठाणे, रायगड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर सह राज्यातील अन्य जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.
ठाणे, कोल्हापूर, सांगली, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यातील जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. तसेच पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यातील अध्यक्षपद सर्वसाधारणसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
कोणत्या जिल्ह्यात कोणते आरक्षण
१.ठाणे -सर्वसाधारण (महिला)२.पालघर - अनुसुसूचित जमाती३. रायगड- सर्वसाधारण४.रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)५.सिंधुदुर्ग - सर्वसाधारण६.नाशिक -सर्वसाधारण७.धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)८.नंदूरबार-अनुसूचित जमाती९.जळगांव - सर्वसाधारण१०.अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)११.पुणे -सर्वसाधारण१२.सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)१३.सांगली - सर्वसाधारण (महिला)१४.सोलापूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग१५.कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)१६.छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण१७.जालना - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)१८.बीड - अनुसूचित जाती (महिला)१९.हिंगोली -अनुसूचित जाती२० नांदेड - नागरिकांचा मागास प्रवर्ग२१.धाराशिव - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)२२.लातूर - सर्वसाधारण (महिला)२३.अमरावती - सर्वसाधारण (महिला)२४.अकोला - अनुसूचित जमाती (महिला)२५.परभणी - अनुसूचित जाती २६.वाशिम अनुसूचित जमाती (महिला)२७. बुलढाणा -सर्वसाधारण२८.यवतमाळ सर्वसाधारण२९.नागपूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग३०.वर्धा- अनुसूचित जाती३१.भंडारा - नागरिकांचा मागास प्रवर्ग३२.गोंदिया - सर्वसाधारण (महिला)३३.चंद्रपूर - अनुसूचित जाती (महिला)३४.गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)
राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांची नेत्यांनी मोठी तयारी सुरू केली आहे, भाजपानेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारही तयारी करत आहेत. काही दिवसातच निवडणुका जाहीर होऊ शकतात.