शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांचे आरक्षण धाब्यावर

By admin | Updated: February 11, 2016 03:41 IST

राज्यातील एकूण २६ महापालिकांमध्ये अनुसूचित जातींसाठी नगरसेवकपदाच्या १३ टक्क्यांप्रमाणे ३३८ जागा राखीव ठेवणे बंधनकारक असताना केवळ २६० जागाच राखीव ठेवण्यात

मुंबई : राज्यातील एकूण २६ महापालिकांमध्ये अनुसूचित जातींसाठी नगरसेवकपदाच्या १३ टक्क्यांप्रमाणे ३३८ जागा राखीव ठेवणे बंधनकारक असताना केवळ २६० जागाच राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमातींसाठी राज्यात सात टक्क्यांप्रमाणे १८२ जागा आरक्षित करणे आवश्यक असताना केवळ ७० ठिकाणीच आरक्षण बहाल करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केला. नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, लातूर, चंद्रपूर, नांदेड, सांगली-मिरज-कुपवाडा, औरंगाबाद आणि अहमदनगर वगळता इतर पंधरा महानगरपालिकांनी मागासवर्गीयांचे आरक्षण दडवून त्या जागा खुल्या प्रवर्गाला बहाल केल्या आहेत. मुंबई महापालिकेत निर्धारित आरक्षणानुसार अनुसूचित जातींसाठी ३०, तर जमातींसाठी १५ जागा राखीव असायला हव्या. प्रत्यक्षात मात्र अनुसूचित जातींसाठी ११, तर जमातींसाठी केवळ दोन जागाच राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात तर केवळ ७ टक्केच आरक्षण देण्यात आले आहे. अनुसूचित जातींच्या नगरसेवकांची संख्या १६ असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात केवळ ६ नगरसेवकच पालिकेत निवडून आले. तर जमातींच्या सदस्यांची संख्या नऊ असायला हवी होती. पण तीनच नगरसेवक या आरक्षणात निवडून आले आहेत. ठाण्यातल्याच भिवंडी महानगरपालिकेतील सदस्यांची संख्या ९० आहे. तिथे अनु. जातींसाठी ११ जागा तर जमातींसाठी सहा जागांवर आरक्षण असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात दोन्ही प्रवर्गांतून केवळ एकच नगरसेवक सभागृहात आहे. मीरा- भार्इंदर महानगरपालिकेतही केवळ एक टक्का आरक्षण देण्यात आले आहे. ९५ सदस्यांच्या सभागृहात दोन्ही प्रवर्गातून प्रत्येकी एकच नगरसेवक सभागृहात निवडून आले आहेत.मालेगाव महानगरपालिकेत किमान १० अनुसूचित जातीचे उमेदवार निवडून यायला हवे होते. मात्र केवळ ३ जागा भरण्यात आल्यात. अनु. जमातीच्या पाचपैकी केवळ दोन जागाच भरण्यात आल्या. जळगाव महानगरपालिकेत आरक्षित जागांची संख्या अनु. जातींसाठी ९ आणि जमातींसाठी ५ इतकी होती. मात्र प्रत्यक्षात भरण्यात आलेल्या आरक्षित जागांची संख्या अनुक्रमे ५ आणि २ असल्याचे स्पष्ट झाले आहे. धुळे महानगरपालिकेच्या ७७ जागांपैकी ९ ठिकाणी मागास आणि ४ ठिकाणी जमातींसाठी आरक्षण आवश्यक असताना अनुक्रमे ५ आणि ३ जागाच राखीव ठेवल्या आहेत. (प्रतिनिधी)या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागितल्याचे गजभिये यांनी सांगितले. आयोगाने मागासवर्गीयांना तातडीने न्याय द्यावा, अन्यथा उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.