शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीवर होणार संशोधन

By admin | Updated: April 23, 2017 01:29 IST

‘मराठी चित्रपटसृष्टीची गंगोत्री’ ही बिरुदावली मिळालेल्या कोल्हापुरात संशोधकांना किंवा रसिकांना चित्रपटसृष्टीची एकत्रित माहिती कुठेही मिळत नाही. एकेकाळी

- इंदुमती गणेश, कोल्हापूर‘मराठी चित्रपटसृष्टीची गंगोत्री’ ही बिरुदावली मिळालेल्या कोल्हापुरात संशोधकांना किंवा रसिकांना चित्रपटसृष्टीची एकत्रित माहिती कुठेही मिळत नाही. एकेकाळी चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ दिलेल्या या कोल्हापूरचा चित्रपट इतिहास आता संशोधन केंद्राच्या रूपाने उपलब्ध होणार आहे. भालजी पेंढारकर सांस्कृतिक कें द्राने हे चित्रपट संशोधन केंद्र साकारले आहे.चित्रपटसृष्टीत भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा, भारताचे पहिले सुपरस्टार, पहिले पोस्टर पेंटिंग, ‘प्रभात’ची सुरुवात असे सगळे पहिलेवहिले घडले ते कोल्हापुरात. आनंदराव पेंटर आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्यापासून सुरू झालेल्या या उगमानंतर भालजी पेंढारकर, अनंत माने, व्ही. शांताराम, पुढे ‘प्रभात’ची स्थापना, संस्थानचा राजाश्रय मिळाल्याने आकाराला आलेले शालिनी सिनेटोन आणि कोल्हापूर सिनेटोन म्हणजे आताचा जयप्रभा स्टुडिओ अशा अनेक प्रवाहांनी कोल्हापूरने चित्रपटसृष्टीला समृद्ध बनविले. लेखकांपासून ते दिग्दर्शक, कलावंत, नेपथ्य, रंग-वेशभूषा, तंत्रज्ञ असा स्वतंत्र उद्योग येथे उभा राहिला. त्यावेळी कोल्हापूर हेच चित्रपटसृष्टीचे प्रमुख केंद्र होते. १९३३ ते १९७५-८० हा काळ कोल्हापुरातील चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ मानला जातो. दुर्दैवाने कोल्हापूरच्या या उज्ज्वल इतिहासाची एकत्रित माहिती कोठेही उपलब्ध नाही. एखाद्या चित्रपट व्यावसायिकाला, रसिकाला किंवा अभ्यासकांना कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीची माहिती तुकड्यांच्या स्वरूपात किंवा जुन्या कलाकार किंवा दिग्दर्शकांशी संपर्क साधावा लागतो. त्यांच्याकडूनही पुरेशी माहिती मिळत नाही. रसिकांना कोल्हापूरचा हा इतिहास एकाच छताखाली उपलब्ध व्हावा, यासाठी भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राने पुढाकार घेतला आहे. केंद्राच्या वतीने गेल्या सहा महिन्यांपासून कोल्हापूरचे चित्रपट संशोधन केंद्र साकारले जात आहे. त्यासाठी केंद्राचे सचिव श्रीकांत डिग्रजकर व चित्रपटसृष्टीचे अभ्यासक प्रा. कविता गगराणी या त्या काळातील स्क्रिप्ट, छायाचित्रे, चित्रपट, वर्तमानपत्रे, मासिके अशा साहित्याचे संकलन करीत आहेत. काय असेल संशोधन केंद्रात? जुन्या काळातील चित्रपटांचे स्क्रिप्ट, कलाकार, निर्माते-दिग्दर्शकांमध्ये होणारे करारपत्र, दुसऱ्या दिवशीच्या चित्रीकरणाची नोटिस, वेळा, तालमी, १९३३ ते ७५ या काळातील चित्रपटांची कलाकार, दिग्दर्शक व चित्रपटांतील प्रसंगांची छायाचित्रे, चित्रपट, चित्रपटसृष्टीवर आधारित पुस्तके, मासिके, दिवाळी अंक, वर्तमानपत्रांची कात्रणे हा सगळा इतिहास येथे असणार आहे. शिवाय, या सर्व दस्तऐवजांचे डिजिटाझेशन करण्यात येणार आहे. रसिकांच्या इच्छेनुसार त्यांची इच्छा असेल, तो चित्रपट पाहण्याची सोय येथे असेल.मुलाखतीतून इतिहासाची मांडणीजुन्या पिढीतील चित्रपट व्यावसायिक म्हणजे या क्षेत्राचा चालता-बोलता इतिहास मानले जातात. नव्या पिढीला त्यांच्याकडून कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा इतिहास कळावा, यासाठी ज्येष्ठांच्या मुलाखती घेण्याचे काम सध्या सुरू आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, सुभाष भुर्के, त्यागराज पेंढारकर यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यापूर्वी माई पेंढारकर, चंद्रकांत मांडरे यांच्या मुलाखतीदेखील उपलब्ध आहेत. भालजींचे स्वतंत्र दालन संशोधन केंद्राचे काम सुरू असताना भालजी पेंढारकरांची सर्वाधिक माहिती मिळाली आहे. कोल्हापूर सिनेटोन (जयप्रभा स्टुडिओ) हस्तांतरणाची कागदपत्रे, भालजींचे चित्रपट, चित्रपटांच्या प्रसंगांची छायाचित्रे, करारपत्रे, स्क्रिट यांचे संकलन असलेले स्वतंत्र दालन येथे साकारण्यात येत आहे. कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा इतिहास कायमस्वरूपी जपला जावा, नव्या पिढीला कोल्हापूरने चित्रपटक्षेत्राला दिलेल्या सुवर्णकाळाची माहिती मिळावी, या उद्देशाने संशोधन केंद्र सुरू करण्यात येत आहे. ज्या नागरिकांकडे ही माहिती किंवा छायाचित्रे उपलब्ध आहेत, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. - श्रीकांत डिग्रजकर, सचिव, भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रकोल्हापूरला फार मोठी चित्रपट परंपरा लाभली आहे. तिची जपणूक व नव्या पिढीला मार्गदर्शन मिळण्यासाठी चित्रपट संशोधन केंद्र मोलाचे साहाय्यभूत ठरणार आहे. - प्रा. कविता गगराणी प्रमुख, भालजी पेंढारकर चित्रपट संशोधन केंद्र