शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

आजी-माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा लागली पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 05:13 IST

उस्मानाबादेत धुमशान । मधुकर चव्हाण, राणा पाटील, तानाजी सावंतांनी थोपटले दंड

उस्मानाबाद जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत यावेळी उथळ पक्षांतर, बंडखोरीने चांगलाच खळखळाट निर्माण केला आहे़ उमेदवारीसाठी ऐनवेळी दुसरा झेंडा हाती घेतलेल्यांची संख्या लक्षणीय आहे़ या सगळ्या उलथापालथीत मतदारांचे लक्ष मात्र, तुळजापूर अन् परंडा मतदारसंघाकडे लागले आहे़ येथून तीन आजी-माजी मंत्री आखाड्यात आहेत़ यावेळची लढत ही तिघांसाठीही प्रतिष्ठेची आहे़ कोणत्याही स्थितीत प्रतिस्पर्ध्याची पाठ लावायचीच, या इर्ष्येने वेगवेगळे डाव टाकले जात आहेत़

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात रंगतदार लढत ही तुळजापुरात होत आहे़ येथे भाजपने माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील व काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्यात कुस्ती लागली आहे़ पाचवेळा निवडून आलेल्या चव्हाणांसमोर यावेळी भाजपने राणा पाटील यांना उतरवून पहिल्यांदाच आव्हान निर्माण केले आहे़ दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी व प्रहारनेही तगडे उमेदवार दिल्याने रंगत वाढली आहे़ असे असले तरी राणा व मधुकररावांसाठी ही लढत टोकाच्या प्रतिष्ठेची आहे़विधानपरिषदेची टर्म अजून बरीच शिल्लक असतानाही जनतेतून निवडून जाण्याचा चंग बांधलेल्या जलसंधारणमंत्री प्रा़तानाजी सावंत यांनी परंडा मतदारसंघात सेनेकडून शड्डू ठोकला आहे़ त्यांच्यापुढे हॅट्ट्रीक साधलेल्या राष्ट्रवादीच्या राहुल मोटे यांचे आव्हान आहे़ राष्ट्रवादीचा हा गड सर करण्यासाठी सावंतांनी जंग-जंग पछाडले आहे़ दरम्यान, या दोघांच्या भांडणात ‘वंचित’च्या सुरेश कांबळे यांनीही मतदारसंघात आपली ‘हवा’ तयार करण्यात यश मिळविले आहे़

उमरग्यात शिवसेनेचे विद्यमान आमदार हॅट्ट्रीक साधण्यासाठी आखाड्यात उतरले आहेत़ मात्र, त्यांच्यापुढे काँग्रेसच्या दिलीप भालेराव यांनी आव्हान निर्माण केले आहे़ येथे वंचित बहुजन आघाडीही निर्णायक स्थितीत आहे़उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने कैलास पाटील या तरुण चेहऱ्याला संधी दिली आहे़ तर राष्ट्रवादीने संजय निंबाळकर यांच्या माध्यमातून सेनेला आव्हान दिले आहे़ या दोघांपुढे बंडखोर अजित पिंगळे, सुरेश पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीचे धनंजय शिंगाडे यांनी चांगलेच आव्हान निर्माण केले आहे़ खा़ओमराजेंसाठी ही जागा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे़प्रचारातील चर्चेचे मुद्देपरंड्यापासून तुळजापूर व्हाया उस्मानाबाद, कृष्णेच्या पाण्याचा मुद्दाच प्रचारात अग्रस्थानी आहे़ मराठवाड्याच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी पुढच्या पाच वर्षात आपणच आणून दाखवू, अशी ग्वाही वरील तिन्ही मतदारसंघात सर्वच उमेदवार मतदारांना देत आहेत़रोजगार हा प्रचारात कळीचा मुद्दा ठरत आहे़ जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प नसल्याने तरुणांना गाव सोडावे लागते़ त्यामुळे पुन्हा एकदा हा विषय सर्वच उमेदवारांनी अजेंड्यावर घेतला आहे़ निवडून गेल्यानंतर आपल्या मतदारसंघात रोजगार देणारे मोठे उद्योग आणण्याचे आश्वासन उमेदवार मतदारांना देत आहेत़जिल्ह्यात बहुसंख्य मतदार हे शेतकरी आहेत़ त्यामुळे स्वाभाविकच प्रचारात हा घटक फ्रंटफुटवर असणाऱ त्यांच्यासाठी सिंचन सुविधा, शेतमालास भाव, कृषी प्रक्रिया उद्योग, पीकविमा, असे परंपरागत मुद्दे रेटले जात आहेत़