शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहणाला 'खो '

By admin | Updated: January 27, 2017 22:26 IST

शासकीय व निमशासकीय कार्यालयांना प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे बंधन असतांनाही २६ जानेवारी रोजी रिसोड येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात त्याचे पालन झाले

शितल धांडे

रिसोड ( वाशिम ), दि. 27 - शासकीय व निमशासकीय कार्यालयांना प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे बंधन असतांनाही २६ जानेवारी रोजी रिसोड येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात त्याचे पालन झाले नसल्याची बाब उघडकीस आली आहे. रिसोड शहराच्या ह्रदयस्थानी असलेल्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या जागी जनपदच्या काळापासून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होते. सन १९९७ मध्ये येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मोप येथे स्थानांतरीत करण्यात आले. यांनतर २००१ साली याच ठिकाणी तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ.जयप्रकाश बगडे यांनी आरोग्य विभागात पाठपुरावा करुन प्रायोगिक तत्वावर तालुका आरोग्य पथकाची स्थापना करुन कार्यालय कार्यान्वीत केले.

कार्यालय कार्यान्वित केल्यानंतर येथे नियमित ध्वजारोहण केल्या जात होते. पुढे २००५ पासून प्रायोगिक तत्वावर असलेल्या या कार्यालयाला शासनाने नियमित मान्यता दिली व या कार्यालयांतर्गत तालुक्यातील केनवड, मोप, कवठा, मांगुळझनक या चार ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार दिला. या सर्व आरोग्य केंद्रातर्गंत २८ आरोग्य उपकेंद्र आहेत. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरात सात कार्यालयीन कर्मचारी शासकीय निवासस्थानात राहतात. आठ ते दहा कर्मचारी वर्गांचे पुरेशे मनुष्यबळ, ध्वजारोहनासाठी ध्वजस्तंभासह मोठा खूला परिसर, कार्यालयाला वषार्काठी लाखो रुपयांचा साधील खचार्साठी येणारा निधी उपलब्ध असतानाही या कार्यालय परिसरत ध्वजारोहन करण्यात आले नसल्याची बाब उघडकीस आली.

या संदर्भात तेथील तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते ' नॉट रिचेबल ' आढळून आल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर केंद्र पंचायत समिती अंतर्गंत येत असल्याचे सांगितले. त्यावरुन पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ते सुध्दा 'नॉट रिचेबल ' होते. अधिकारी संपर्क कक्षाच्या बाहेर४रिसोडच्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन सोहळा का झाला नाही, हे जाणून घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शंकर वाघ आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मकासरे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु दोघांचाही भ्रमणध्वनी संपर्क कक्षेत नव्हता. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हे गटविकास अधिकारी पंचायत समितीच्या अधिपत्याखाली येते. त्यामुळे रिसोड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयातील ध्वजारोहण कार्यक्रमात सहभाग घेतला असेल. -डॉ. दिपक सेलोकारजिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम