शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनासाठी रिपब्लिकन पक्षाची राज्यभर निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 18:01 IST

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनासाठी 10 जानेवारी रोजी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत.

मुंबई - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनासाठी 10 जानेवारी रोजी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत. तसेच मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाद्वारे मागासवर्गीयांना देण्यात आलेली कर्ज माफ करण्यात यावे, त्याचबरोबर शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज मुंबईत केली. नागरिकत्व सुधारणा कायदा हा देशहितासाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा करून क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत झाले पाहिजे. नागरिकत्व सुधारणा कायदा देशातील मुस्लिम, दलित भटके, विमुक्त कोणत्याही समाजघटकाविरोधात नाही, कोणाचेही  नागरिकत्व हिरावून घेणारा हा कायदा नाही तर नागरिकत्व देणारा कायदा आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश येथून आलेल्या बौद्ध, हिंदू, ख्रिस्ती धर्मीयांना नागरिकत्व देणारा कायदा आहे. त्यामुळे भारतीय मुस्लिमांवर अन्याय करणारा हा कायदा नाही. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पसरविण्यात आलेल्या गैरसमजाविरुद्ध समाजात जनजागृती होण्यासाठी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याचे महत्व समजावून सांगण्यासाठी येत्या 10 जानेवारी रोजी रिपाइंतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयांवर जनजागरणार्थ निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली आहे. 

महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, लीड कॉम, अपंग विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ आदी महामंडळाकडून मागासवर्गीय बेरोजगारांना रोजगारासाठी देण्यात आलेले कर्ज माफ करण्यात यावे, या मागणीसाठी 10 जानेवारी रोजी रिपाइंतर्फे राज्यभर निदर्शने करण्यात येणार आहेत. 

तसेच महाविकास आघाडी सरकारद्वारे शेतकर्‍यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची केलेली घोषणा फसवी असून, शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे सत्तेवर येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे. शेतकर्‍यांचे सरसकट सर्व कर्ज माफ करावे या मागणीसाठी 10 जानेवारीला राज्यभर रिपाइंच्या वतीने प्रत्येक जिल्हाअधिकारी आणि तहसील कार्यालयांवर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती ना. रामदास आठवले यांनी केली आहे. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले