शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

दादरमध्ये रिपब्लिकन सेनेचा मोर्चा, दुकानांवर दगडफेक

By admin | Published: June 28, 2016 2:18 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेने दादरमध्ये मोर्चा काढला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २८ - भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दादर येथील जुनी ऐतिहासिक प्रिटिंग प्रेस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेने दादरमध्ये मोर्चा काढला आहे. या मोर्चामुळे दादर पूर्व भागातील काही दुकान बंद करण्यात आली असून, काही दुकानांवर आंदोलकांनी दगडफेकही केल्याचे वृत्त आहे. यामुळे दादर परिसरात तणावाचे वातावरण असून हिंदमाता व दादर भागातील अनेक दुकाने बंद करण्यात आली आहेत, तसेच काही ठिकाणी काचांचा खचही पडला आहे. दरम्यान मोर्चामुळे वाहतूक कोंडीही झाली असून टिळक ब्रीजजवऴही वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
 
स्वत:हा आनंदराज आंबेडकर या मोर्चाचे नेतृत्व करत असून, आंबेडकर भवन ते भोईवाडा पोलिस स्थानकापर्यंत हा मोर्चा काढला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि पीपल्स इम्प्रूव्हमेंट या ट्रस्टकडे या दोन वास्तूंची मालकी होती. सोमवारी या पाडकामाच्या निषेधार्थ वरळीमध्ये बंद पुकारण्यात आला होता. 
 
आणखी वाचा 
 
ट्रस्टने पुनर्विकासासाठी पाडकाम केल्याचे सांगितले आहे. मात्र त्याला आंबेडकर कुटुंबीय व नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. आंबेडकर कुटुंबीयांकडून आलेल्या तक्रारीनुसार याबाबत भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादर पूर्वेकडील गोकूळदास पास्ता लेन परिसरातील डॉ. आंबेडकर भवन ही इमारत धोकादायक असल्याचे पालिकेने जाहीर केले. 
 
१ जून रोजी याबाबत नोटीसही बजाविण्यात आली. भवनातील सर्व बांधकामे नोटीस प्राप्त होताच ३० दिवसांच्या आत निष्कासित करणे संस्थेला बंधनकारक होते. शनिवारी पहाटे ३च्या सुमारास आंबेडकरी जनतेला थांगपत्ता लागू नये म्हणून या भवनावर बुलडोझर चढविण्यात आला. या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी जुनी इमारत पाडण्यात आल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. शुक्रवारी रात्री बुलडोझर लावून येथे पाडकाम करण्यात आले.