अकोला: वाशिम बायपास येथील रहिवासी, तसेच रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचार्याने धामणगाव येथील रहिवासी युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा वारंवार लैंगिक छळ केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री समोर आली. या प्रकरणी युवतीने रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून, पोलिसांनी नोंद करून हे प्रकरण धामणगाव पोलिसांकडे वर्ग केले आहे. रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सुशील देवराव खंडारे यांनी धामणगाव येथील पुष्करनगरच्या रहिवासी असलेल्या २२ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केला. युवतीने यासाठी विरोध केला; मात्र आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवित तिचा लैंगिक छळ सुरूच ठेवला. या युवतीला अकोला, औरंगाबाद, अमरावती, तसेच धामणगाव येथे नेऊन छळ केल्याची तक्रार रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणाचे घटनास्थळ हे प्रारंभीपासूनच धामणगाव असल्याने रामदासपेठ पोलिसांनी चौकशी करून या प्रकरणाची नोंद घेतली; मात्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया धामणगाव पोलिसांकडे वर्ग केली आहे.
पोलीस कर्मचा-याविरुद्ध बलात्काराची तक्रार
By admin | Updated: March 13, 2016 02:31 IST