ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १४ - राज्यातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करणा-या चितळे समितीचा अहवाल शनिवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला. या अहवालात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चिट देण्यात आल्याचे समजते. विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी (शनिवार) चितळे समितीचा अहवाल मांडण्यात आला.
दरम्यान, चितळे समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर राज्याच्या सिंचन क्षेत्रात २६ टक्के व सिंचित क्षेत्रात ४२ टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे.
चितळे समितीने अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावरच ठपका ठेवला होता, असा दावा शुक्रवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.