शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

‘१० लाख ३७ हजार नादुरुस्त वीजमीटर बदला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 03:51 IST

- राज्यातील सुमारे १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे नादुरुस्त वीजमीटर येत्या महिन्याभरात बदलावेत. हे मीटर बदलताना त्याची जागेवरच मीटर क्रमांकासह मोबाइल अ‍ॅपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंद करण्यात यावी, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले.

मुंबई - राज्यातील सुमारे १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे नादुरुस्त वीजमीटर येत्या महिन्याभरात बदलावेत. हे मीटर बदलताना त्याची जागेवरच मीटर क्रमांकासह मोबाइल अ‍ॅपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंद करण्यात यावी, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले. राज्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई मुख्यालयात आयोजित मुख्य अभियंत्यांच्या बैठकीत ते बोलत होते.संजीव कुमार म्हणाले, अचूक बिलिंगसाठी विशेषत्वाने प्रयत्न सुरू आहेत. नवीन वीजजोडणीसह नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना पुरेसे नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सिंगल फेजचे आणखी ३० लाख नवीन वीजमीटर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नादुरुस्त आढळून आलेले १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे वीजमीटर सर्वप्रथम एक महिन्याच्या कालावधीत बदलण्यात यावेत. त्यानंतर नादुरुस्त असलेले सिंगल फेजचे एकही वीजमीटर ग्राहकाकडे राहणार नाही याप्रमाणे कार्यवाही करावी.तसेच यापुढे ग्राहकांच्या तक्रारीनुसार किंवा महावितरणच्या पर्यवेक्षणात नादुरुस्त आढळून येणारे वीजमीटर त्वरित बदलण्याची काळजी घ्यावी.महावितरणकडून मीटर रीडिंग मोबाइल अ‍ॅपद्वारे सुरू असल्याने बिलिंग प्रणालीत पारदर्शकता आलेली आहे. गतिमानता आली आहे. परंतु मीटर रीडिंग एजन्सीजकडून अद्यापही सदोष मीटर रीडिंग घेण्याचे प्रकार दिसून येत आहेत. परिणामी ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा त्रास होत आहे. मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोबतच महावितरणच्या महसुलाचे नुकसान होत आहे. असे सदोष रीडिंगचे प्रकार टाळण्यासाठी व बिलिंगमध्ये अचूकता आणण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी स्थानिक उपाययोजना कराव्यात.महावितरणचीपरिमंडळे : १६एकूण सिंगल फेज नादुरुस्त वीजमीटर :१० लाख ३७ हजारऔरंगाबाद प्रादेशिक विभाग :१ लाख ८५ हजारनागपूर प्रादेशिक विभाग : २ लाखकोकण प्रादेशिक विभाग : ४ लाख ५३ हजारपुणे प्रादेशिक विभाग : १ लाख ९८ हजार

टॅग्स :mahavitaranमहावितरणMaharashtraमहाराष्ट्र