शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका भाड्याने देणे!

By admin | Updated: August 30, 2016 01:40 IST

शैक्षणिक संस्थेला महापालिकेची जागा भाड्याने देण्याच्या प्रस्तावाला ग्रामीण भागातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत जोरदार विरोध केला.

पिंपरी : शैक्षणिक संस्थेला महापालिकेची जागा भाड्याने देण्याच्या प्रस्तावाला ग्रामीण भागातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत जोरदार विरोध केला. ‘महापालिका भाड्याने देणे आहे. महापालिकेच्या सर्व मिळकती भाड्याने देणे आहे,’ असे फलक सभागृहात फडकविले. या विषयावर बोलू न दिल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. सत्तारूढ राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांनी सभात्याग केला.चिखली परिसरातील माध्यमिक शाळेसाठी अठरा हजार चौरस मीटर जागेचे आरक्षण आहे. यापैकी ४७५४ चौरस मीटर क्षेत्र हे महापालिकेने टीडीआरच्या बदल्यात ताब्यात घेतले आहे. उर्वरित क्षेत्राचा ताबा एका संस्थेकडे आहे. तर ४७५४ चौरस मीटर हे क्षेत्र महापालिकेने माध्यमिक शाळेसाठी आरक्षित केले आहे. ही जागा तीस वर्षांच्या कालावधीसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी सभेसमोर ठेवला होता. या प्रस्तावाला ग्रामीण भागातील राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने, मनसेचे राहुल जाधव, अपक्षाचे गटनेते सुरेश म्हेत्रे यांनी जोरदार विरोध केला. ‘महापालिका भाड्याने देणे आहे. महापालिकेच्या सर्व मिळकती भाड्याने देणे आहे’ असे फलक सभागृहात फडकावले. या वेळी योगेश बहल म्हणाले, ‘‘संबंधित विषय हे आयुक्तांचे डॉकेट आहे. उगाच आरडाओरडा होत आहे. विषयाबद्दल प्रशासनास म्हणणे मांडू द्यात. खुलासा करू द्यावा.’’ त्या वेळी आम्हाला बोलू द्या, अशी मागणी ग्रामीण भागातील नगरसेवकांनी केली. त्यावर महापौरांनी प्रवीण आष्टीकर यांनी खुलासा करण्यास सांगितले. आष्टीकर म्हणाले, ‘‘संबंधित विषयासाठी निविदाही मागविल्या. २ कोटी ५१ लाख ४८ हजार ६६० रुपयांच्या तीन निविदा आल्या होत्या. त्यापैकी सुभद्राज एज्युकेशनल सोसायटी यांचीच निविदा पात्र ठरली. तसेच त्यांनी ०.५० टक्के अशी २ कोटी ५२ लाख असा जास्त दर सादर केला. त्यामुळे संबंधित संस्थेला जागा दिली आहे.’’ त्यावर महापौरांनी हा विषय तहकूब ठेवला आहे, असे सांगितले. त्यावर साने, जाधव, म्हेत्रे यांच्यासह सीमा सावळे, आशा शेंडगेंनी चर्चेची मागणी केली. या वेळी महापौर व बहल यांच्यात काही काळ शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावर चिडून महापौर म्हणाल्या, ‘मलाही काही अधिकार आहेत ना? विषय तहकूब ठेवला आहे. आता चर्चा नाही.’’ त्यानंतर हा विषय तहकूब केला आहे. त्यावर चर्चा करून सभागृहाचा वेळ वाया जाऊ नये, असे महापौर म्हणाल्या. चर्चेची मागणी फेटाळली. त्यावर चिडलेल्या साने व जाधव यांनी निषेध करत सभात्याग केला.